"ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार " शिक्षणमहर्षि प. पू . डॉ.बापूजी साळुंखे .

Thursday, 30 March 2023

                                                                  अभियांत्रिकी विभाग.

                                                                        वर्ष.2023.

                                                                      महिना मार्च.

                                       शाळेचे नाव. सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल केंदुर.



इयत्ता :नववी.

उपक्रमाचे नाव:पाईपलाईन साठी बांधकाम करणे.

साहित्य:मेजरींग टेप पावडे घमेल हॅन्ड ग्लोज कोळंबा दोरी लेवल ट्यूब इत्यादी.

थोडक्यात माहिती:

प्रथम मुलांना माहिती समजावून सांगितली यासाठी लागणारे मटेरियल आम्ही जमा केले बांधकामासाठी कोणकोणत्या विटा वापरतात कोणत्या साईटचा वापरतात हे मुलांना समजावून सांगितले. सर्वप्रथम मुलांनी वाळू सिमेंट पाणी याचे मिश्रण केले हे बांधकाम आम्ही सहा इंची मध्ये पूर्ण करून घेतले. ही पद्धत मुलांच्या लक्षात आली व यातून मुलांना हे स्वतः काम केल्यामुळे मुलांना आनंद झाला.




Friday, 24 February 2023

                                                                           गृह आरोग्य

                                                                             वर्ष २०२३

                                                                        महिना फेब्रुवारी


                                             शाळेचे नाव-सरदार रघुनाथ ढवळे हायस्कूल केंदुर 

उपक्रमाचे नाव -     केमिकल विरहित साबण

साहित्य -               साबण बेस , कोरफडीचा रस, कडुनिंबाच्या पानांचा रस, व्हिटामिन इ ओईल ची गोळी , पातेले,                                  साबणाचा साचा ई 

कृती-                     एका पातेल्यात साबण बेस चे तुकडे करून टाकले नंतर त्यात कोरफडीचा रस आणि                                            कडुनिंबाच्या पानांचा रस व्हिटामिन इ ओईल टाकले हे मिश्रण एकजीव करून साच्यात                                        ओतून घेतल मिश्रण थंड झाल्यावर साच्यातून साबण काढले










Friday, 27 January 2023

उपक्रमाचे नाव - तिळगुळ चिक्की

                                                                  गृहआरोग्य 

 वर्ष 2023

 महिना- जानेवारी

 शाळेचे नाव -सरदार रघुनाथ ढवळे हायस्कूल केंदुर

 इयत्ता-  आठवी

                                                उपक्रमाचे नाव - तिळगुळ चिक्की


                       साहित्य= ३.१/२ किलोतीळ ,७किलोगूळ, ५०ग्रम तूप, वेलची५ग्रम , शेंगदाणे २ किलो, कढई ,                                               चमचा थाळी , सुरी, वाटी.  

कृती=

1) कढईचा वापर करून तिळ भाजून घेणे. शेंगदाणे बारीक कुठ करून घेणे .

2-कढईत गूळ व थोडेसे पाणी घाला 

3-मंद आचेवर गुळाचा गोळीबंद पाक तयार करणे

4-तूप वितळून एका थाळीमध्ये पसरून लाऊन तयार ठेवणे

5-गुळाच्या गोळीबंद पाकामध्ये तीळ शेंगदाणे कूटटाकून चमच्याने हलवा व ते गरम असतानाच तूप लावलेल्या थाळी मध्ये पसरवा 

6-मिश्रणाचा  थर थोडा गार झाल्यावर सूरीने त्यात उभे आडवे छेद घेऊन वड्या तयार करणे. 

7- मिश्रण पुर्ण गार झाल्यावर थाळीतून वड्या सुट्या करणे. 

अश्या प्रकारे 10 किलो चिक्की तयार केली. 

मकरसंक्रांती निम्मित लोकपोयोगी सेवा केली. 

एकूण खर्च -1000, नफा -1200

 




Thursday, 31 March 2022

सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल, केंदूर








श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित 'सरदार रघुनाथराव ढवळे   हायस्कूल आणि  ज्युनिअर कॉलेज ,केंदूर मधे कार्याध्यक्ष    प्राचार्य अभयकुमार साळुंखे ,प्राचार्य सुळगेकर सर, पुणे विभाग प्रमुख  प्राचार्य गवळी एस .एम. सर यांची उपस्थिती शुक्रवार दिनांक बारा ऑक्टोबर 2018 रोजी लाभली.या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हेही उपस्थित होते संस्था आणि खासदार फंड या निधीतून शालेय वर्ग खोलींचे भूमिपूजन करण्यात आले. 
संस्था माता आणि बापूजींच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रम सुरू झाला.या कार्यक्रमांमध्ये कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी दलित मित्र बापूजी साळुंखे यांच्या कार्याची माहिती दिली .तसेच संस्थेच्या शैक्षणिक संकुल संबधी माहिती दिली. ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार या संस्थेचा बि्द वाक्यानुसार गुरुदेव कार्यकर्त्यांचे काम चालू आहे.यांची  उपस्थितांना जाणीव करून दिली.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने संस्था विभागीय सदस्य माजी सभापती सदाशिवराव  थिटे , रामशेठ साकोरे  प्राचार्य  बेले एम .डी. सर  तसेच शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष तुकारामशेठ सुकरे, स्कूल कमिटी चेअरमन पांडुरंग दादा ताथवडे ,आंबेगाव पंचायत समिती सदस्य रवींद्रशेठ करंजखेले, माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्रीताई पलांडे ,
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अरुण भाऊ गिरे, उपसरपंच अभिजीतशेठ साकोरे, शिवसेना शाखाध्यक्ष जयदीप शेठ ताठे, शिरूर आंबेगावमधील शिवसेना कार्यकर्ते, तसेच केंदूर आणि परिसरातील आजी माजी पदाधिकारी ग्रामस्थ , प्रशालेतील वेगवेगळ्या विभागातील अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक ,स्कूलचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Friday, 18 March 2022

MARCH2022

 शाळेचे नाव:- सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल केंदुर

 इयत्ता- नववी

 विभागाचे नाव- ऊर्जा व पर्यावरण उपक्रमाचे नाव -गोडाऊन वायरिंग करणे
 थोडक्यात माहिती-इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांच्या वर्गावर गोडाऊन वायरिंग करणे यावर लेक्चर झाले. यामध्ये सर्वप्रथम विद्यार्थ्यांना गोडाऊन वायरिंग म्हणजे काय? ती कशी करतात हे सांगितले . गोडाऊन वायरिंग करण्यासाठी कोणती साधने वापरतात तसेच त्यांचा वापर कसा करावा हे सांगून विद्यार्थ्यांना गोडाऊन वायरिंग ची मंडल आकृती तयार करण्यास शिकवले . तसेच विद्यार्थ्यांना विविध प्रकार दाखवून त्यांचा वापर कसा करावा हे देखील स्पष्ट केले. त्यानंतर विद्यार्थ्यांकडून वायरिंग करून घेतली .तसेच गोडाऊन वायरिंग ची पद्धत कुठे कुठे वापरतात हेही विद्यार्थ्यांना यातून कळाले. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन झाले.













इयत्ता आठवी
प्रात्यक्षिकाचे नाव. शाळेमधील बेंच दुरुस्ती करणे
प्रथम आम्ही मुलांना माहिती समजावून सांगितली शाळेमधील त्यांची तुटलेली खराब झालेली आम्ही त्या ब्याच बाहेर काढल्या व अभियांत्रिकी विभागामध्ये आय बी टी यामार्फत मुलांना याबद्दल माहिती सांगितली बेंच तुटलेल्या ठिकाणी आम्ही नवीन फळी बसविली व कटिंग केली तुटलेल्या ठिकाणी वेल्डिंग केले. ड्रिल मशिनच्या साह्याने आम्ही नट बोलट हॉल पाडले अशाप्रकारे मुलांना माहिती समजली




 उपक्रमाचे नाव - ओल्या नारळाच्या वड्या
इयत्ता - 8 वि 
थोडक्यात माहिती -  ओल्या नारळाच्या वड्या बनवण्यासाठी नारळ, साखर, तूप, वीलायची, दूध, बदाम, इ. साहित्य वापरण्यात आले. प्रथम ओल्या नारळ किसनीने बारीक किसून घ्या.  किंवा मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. कढईमध्ये थोडेसे तूप टाका. त्यामध्ये बारीक केलेले खोबरे टाका व साखर टाका. वारंवार चमच्याने हलवत राहा. नंतर त्यामध्ये थोडे दूध टाका व विलायची पूड टाका. हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर एका ताटाला तूप लावून घ्या व त्यामध्ये हे मिश्रण व्यवस्थित पसरून घ्या. त्यावर बदामाचे काप टाका गरम असतानाच चाकूने वड्या पाडून घ्या.




इयत्ता - नववी            प्रात्यक्षिकाची नाव- प्लॅस्टिक पिशवीमध्ये फुल झाडांची लागवड करणे                   इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेत आयबी टीव्ही बघा मध्ये प्लॅस्टिक पिशवीमध्ये माती व शेणखत मिसळून त्यामध्ये गुलाब जास्वंद मोगरा इत्यादी फुलझाडांची फांदी लागवड करून त्याला वेळच्या वेळी पाणी दिले अशा पद्धतीने दोनशे रोपे विद्यार्थ्यांनी तयार केली विद्यार्थ्यांना हे प्रात्यक्षिक करत असताना खूप आनंद झाला हे साहित्य जमा करण्यासाठी त्यांनी दोन-तीन मुलांचे ग्रुप तयार केले व त्यामध्ये माती शेणखत प्लास्टिक पिशवी कटर चाकू सर्व साहित्याची जमवाजमव केली व प्रथम प्लास्टिकच्या पिशव्या माती व शेणखत या मिश्रणाने भरून घेतल्या व त्यामध्ये जास्वंद गुलाब मोगरा यांच्या फांद्यांची लागवड केली अशा पद्धतीने रोपे तयार करण्याच्या पद्धती विद्यार्थी शिकले आपल्या घरी प्रत्येक विद्यार्थ्यांनी 20 रोपे तयार करण्यास सांगितले          









FEBRUARY2022

 शाळेचे नाव:- सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल केंदुर

 इयत्ता -आठवी 

उपक्रमाचे नाव- सिम्पल सर्किट बनविणे.
थोडक्यात माहिती -इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांच्या वर्गावर सिम्पल सर्किट बनविणे या विषयावर लेक्चर झाले. यामध्ये सर्वप्रथम विद्यार्थ्यांना सिम्पल सर्किट म्हणजे काय? हे सांगितले. विद्यार्थ्यांना साधे वायरिंग बद्दल सर्व कन्सेप्ट क्लिअर केल्या .त्यानंतर सिम्पल सर्किटमध्ये एकसर जोडणी आणि समांतर जोडणी हे प्रकार पडतात हे  सांगून एक किंवा दोन बल्ब वापरून आपण एक आणि समांतर जोडणी करू शकतो हेही विद्यार्थ्यांना कळाले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी एक किंवा दोन बल्ब वापरून सिम्पल सर्किट बनविले .सिम्पल  सर्किट बनवण्यास एकूण खर्च 80 ते 90 रुपये इतका आला. तसेच या प्रॅक्टिकल यामध्ये विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारे वायरिंग कनेक्शन करण्यास शिकले.



इयत्ता नववी
प्रात्यक्षिक नाव-टॉयलेट बाथरूम खिडकी तयार करणे
प्रथम आम्ही मुलांना माहिती समजावून सांगितली बाथरूम साठी व टॉयलेट साठी खिडकी तयार करणे आहे त्या साठी कोण कोणते मटेरियल वापरावयाचे आहे याची पहिली आम्ही यादी बनविली यासाठी लागणारे मटेरियल 22.3 चा अँगल आम्ही दहा फूट घेतला व.10.mm बार घेऊन मेजरींग टेप ने आम्ही मार्किंग केले सुरुवातीला चौकोनी बॉक्स तयार केला. याची मेजरमेंट घेऊन त्यासाठी लागणारे दहा एमएम चे बार कटिंग केले.२ फूट. लांबी व रुंदी दोन फूट असा चौकोनी बॉक्स वेल्ड केला. दहा एमएम चे बार कटिंग केलेले चार इंची अंतरावर वेल्ड केले अशाप्रकारे आम्ही टॉयलेट बाथरूम खिडकी बनविली.




इयत्ता - नववी            प्रात्यक्षिकाची नाव- प्लॅस्टिक पिशवीमध्ये फुल झाडांची लागवड करणे                   इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेत आयबी टीव्ही बघा मध्ये प्लॅस्टिक पिशवीमध्ये माती व शेणखत मिसळून त्यामध्ये गुलाब जास्वंद मोगरा इत्यादी फुलझाडांची फांदी लागवड करून त्याला वेळच्या वेळी पाणी दिले अशा पद्धतीने दोनशे रोपे विद्यार्थ्यांनी तयार केली विद्यार्थ्यांना हे प्रात्यक्षिक करत असताना खूप आनंद झाला हे साहित्य जमा करण्यासाठी त्यांनी दोन-तीन मुलांचे ग्रुप तयार केले व त्यामध्ये माती शेणखत प्लास्टिक पिशवी कटर चाकू सर्व साहित्याची जमवाजमव केली व प्रथम प्लास्टिकच्या पिशव्या माती व शेणखत या मिश्रणाने भरून घेतल्या व त्यामध्ये जास्वंद गुलाब मोगरा यांच्या फांद्यांची लागवड केली अशा पद्धतीने रोपे तयार करण्याच्या पद्धती विद्यार्थी शिकले आपल्या घरी प्रत्येक विद्यार्थ्यांनी 20 रोपे तयार करण्यास सांगितले           








उपक्रमाचे नाव - ओरिओ बिस्किटाचा केक बनविणे.
इयत्ता - 9  वी 
थोडक्यात माहिती -  गृह आरोग्य विभागाअंतर्गत प्रात्यक्षिक करत असताना भाजणी हे प्रक्रिया अभ्यासण्यासाठी बिस्किटाचा केक बनविण्यात आला. त्यासाठी ओरिओ बिस्कीट पॅकेट, पिठीसाखर, दूध, बेकिंग पावडर, व्हॅनिला इसेन्स, काजू, तूप, इत्यादी साहित्याचा वापर करण्यात आला. प्रथम बिस्कीट मधील क्रीम काढून घेतली व बिस्किटाचे तुकडे करून ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतले. एका  बाउल मध्ये बारीक केलेली  बिस्किटे,  पिठीसाखर, बेकिंग पावडर, व्हॅनिला इसेन्स, एकत्र मिक्स करून घेतले. त्यामध्ये थोडे थोडे दूध टाकून मिश्रण तयार केले. केकच्या भांड्याला आतून तूप लावून घेतले व त्यामध्ये हे मिश्रण ओतले.  सजावटीसाठी काजू टाकले. व ओव्हन मध्ये 180°cक तापमानाला 25 मिनिटे  भाजून घेतले. यामधून मुलांनी भाजण्याची प्रक्रिया अभ्यासली.








Thursday, 3 February 2022

JANUARY2022

 शाळेचे नाव:- सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल केंदुर


इयत्ता - दहावी
विभागाचे नाव- ऊर्जा व पर्यावरण
 उपक्रमाचे नाव- दोन किंवा त्यापेक्षा जास्त दिवे एक सर  जोडणी करणे.
थोडक्यात माहिती-इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या वर्गावर दोन किंवा त्यापेक्षा जास्त दिवे एकसर जोडणी करणे या विषयावर लेक्चर झाले. यामध्ये सर्वप्रथम विद्यार्थ्यांना एकसर  जोडणी म्हणजे काय? ती कशी करतात? हे सांगितले. तसेच जोडणीचे विविध प्रकारही सांगितले .विद्यार्थ्यांना एकसर जोडणी बद्दल संपूर्ण माहिती दिली .तसेच एकसर/समांतर जोडणी चा वापर कुठे - कुठे केला जातो हे देखील सांगितले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांकडून दोन पेक्षा जास्त दिवे /एकसर जोडणी करून घेतली.  एकसर  जोडणी करताना 200 रुपये इतका खर्च आला. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या सर्व शंकांचे निरसन होऊन लेक्चर संपले.





 प्रात्यक्षिकाचे नाव - पाणी तपासणे.
 इयत्ता - दहावी
 थोडक्यात माहिती -  दूषित पाण्यामुळे उलट्या जुलाब सर्दी खोकला ताप अशा प्रकारचे आजार उद्भवतात त्यामुळे आपण जे पाणी पितो ते पाणी पिण्यायोग्य आहे की नाही हे आपणास माहिती नसते.
 आपण पाणी कोणत्या प्रकारचे पिले  पाहिजे.  हे तपासण्यासाठी H2O स्विफ्ट च्या साह्याने पाणी परीक्षण करण्यात आले यामध्ये H2O असलेल्या बॉटल मध्ये  बाला पर्यंत पाणी बांधण्यात आले व झाकण बंद करुन ते तीन दिवस तसेच ठेवले बॉटल मधील पाण्याचा कलर काळा झाल्यास पाणी पिण्यायोग्य नाही व  व पाण्याचा कलर पिवळसर झाला तर ते पाणी पिण्यायोग्य असे निष्कर्ष मनात आले अशाप्रकारे पाणी परीक्षण केले.



 प्रात्यक्षिकाचे नाव- दशपर्णी अर्क तयार करणे                                  
   इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी सेंद्रिय पद्धतीने दशपर्णी अर्क तयार करणे प्रात्यक्षिक तयार करण्यासाठी आपल्या सभोवताली 10 झाडांचा पाला एकत्र करून आणला व शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी कुठून  घेतला व तीस दिवस सावलीमध्ये आंबवण्यासाठी ठेवला त्याला दररोज काठीने सकाळी व संध्याकाळी ढवळून घेतला अशा पद्धतीने तयार झालेले मिश्रण एका फडके ने काढून घेतले व शाळेच्या विभागांमध्ये वापर केला सेंद्रिय पद्धतीने तयार केलेले दशपर्णी अर्क हे काळी किडी मावा तुडतुडे अशा विविध कीटकांवर फवारणी केली व त्याचं योग्य रिझल्ट मिळाला


इयत्ता:-10 वी
उपक्रमाचे नाव :- पाया खोद काम करणे
प्रथम मुलांना माहिती देवून बांधकाम करण्यासाठी सुरवातीला पाया खोद काम करणे गरजेचे आहे यासाठी लागणारे साहित्य टिकाव, खोरे,घमेल या साधनांचा वापर करून मुलांनी चांगल्या प्रकारे खोदकाम केले यामध्ये मुलांना चांगल्या प्रकारे माहिती समजली.


इयत्ता:- दहावी
उपक्रमाचे नाव:-खिडकीचे ग्रील बनविणे.
थोडक्यात माहिती:-प्रथम खिडकी चे मापे घेऊन त्यासाठी लागणारे मटेरियल ची यादी तयार केली मुलांना समजावून सांगितले यासाठी कोणते मटेरियल आपण वापरायचे आहे.२५X3 या साइज 8 अंगेल व 10m बार व त्यासाठी लागणारे साहित्य मीटर टेप गुण्या वेल्डिंग रॉड हॅन्डग्लोज प्रथम आम्ही ३० इंचीची 2 नग कटिंग केली व 24 इंचीचे 2 नग केले प्रथम मुलींनी चौकोनी फ्रेम बनवली व वेल्डिंग केली त्यासाठी 10 m बार 4 इंच अंतरावरील वेल्डिंग केले.असे 24 इंचाचे 6नग कटिंग करून वेल्डिंग केले अशा पध्दतीने मुलांना माहिती समजली.














december2021

 

शाळेचे नाव:- सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल केंदुर

 उपक्रमाचे नाव -माळ रिपेअर करणे

इयत्ता - 9 वी 

इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांच्या वर्गावर माळ रिपेरिंग करणे या विषयावर लेक्चर झाले. त्यामध्ये सर्वप्रथम विद्यार्थ्यांना माळेचे कनेक्शन समजावून सांगितले. त्याबद्दल विद्यार्थ्यांना संपूर्ण माहिती मिळाल्यावर त्यांना मल्टीमीटर ने आणि कंट्युनिटी टेस्टर ने वायर व बल्ब कसे चेक करायचे ते विद्यार्थ्यांना कळले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी मल्टीमीटर आणि कटयुनिटी टेस्टर च्या सहाय्याने सर्व एलईडी बल्ब चेक केले आणि माळेचा फॉल्ट शोधून काढला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी माळेचे खराब झालेले पार्ट्स बदलून माळ रिपेअर केली किंवा चालू केली.




प्रात्यक्षिकाचे नाव - तिळाची चिक्की बनविणे.
इयत्ता - 9 वी  
 थोडक्यात माहिती -  
गृह आरोग्य विभागा  त् तिळ व गुळाची चिक्की अडविण्यात आली.  त्यासाठी पांढरे तीळ, गुळ तूप  इत्यादी साहित्य वापरण्यात आले.  त्यामध्ये तीळ निवडून भाजून घेण्यात आले गुळ कापून घेतला कढईमध्ये थोडे पाणी टाकून त्याबद्दल गुळ टाकला गुळाचा पाक तयार झाल्या त्याबद्दल टाकले व व्यवस्थित मिक्स करून घेतले पोळपाटाला तुप लावून घेतले व त्यावर हे मिश्रण पसरवून घेतले व थंड होण्याअगोदर वड्या पाडून घेतल्या मकरसंक्राती निमित्त तीळची चिक्की बनविण्यात आली.




प्रात्यक्षिकाचे नाव- मेथीचे पिक घेणे व विक्री करणे                                         
  इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या एक गुंठे क्षेत्रावर टिकाऊ कुदळे चे साह्याने खोदणी करून त्यामध्ये बीज प्रक्रिया केलेले मेथीचे बी याची टाकणी केली व त्याला पाणी दिले दोन दिवसांनी पुन्हा पाणी दिले व अशा पद्धतीने चार दिवसानंतर पाच दिवसानंतर पुन्हा पाणी दिले अशा पद्धतीने 28 ते 30 दिवसांमध्ये मेथीची काढणी केली व शाळेमध्ये शिक्षक विद्यार्थी व गावांमध्ये त्याची विक्री केली यातून हे प्रात्यक्षिक करण्यासाठी 200 वीस रुपये खर्चाला व त्यातून 260 रुपये मिळाले यातून 40 रुपये नफा झाला हे प्रात्यक्षिक करत असताना विद्यार्थ्यांना खूप आनंद झाला व हे प्रात्यक्षिक पूर्ण झाले       





इयत्ता:-10 वी
उपक्रमाचे नाव:- बांधकाम करणे
प्रथम मुलांना माहिती देवून त्यासाठी लागणारे साहित्य थापी, ओकेबा, हॅन्डग्लोज याचा वापर करून आम्ही व मुलांनी व इंच या साइजचे बांधकाम केले यासाठी उभ्या रचनेचा वापर मटेरियल क्रिशन , विट ,पाणी सिमेंट याचा वापर करून एकत्र मिश्रण केले योग्य मापात आम्ही मुलांना माहिती देवून बांधकाम केले.




प्रात्यक्षिकाचे नाव - लोणचे बनविणे
 इयत्ता - 9वी
 थोडक्यात माहिती - गृह विभागाअंतर्गत प्रात्यक्षिक करत असताना अन्नपदार्थ पुरविने  प्रक्रिया  अभ्यासताना गाजर, मुळा, आलं, लसूण, मिरची यांचे मिश्र  लोणचे बनविण्यात आले. थंडीच्या दिवसांमध्ये आपल्या शरीराला उष्णतेची गरज असते ही उष्णता गाजर व मुळापासून मिळते. त्यामुळे गाजर मुळ्याचे लोणचे बनविण्यात आले. त्यासाठी गाजर, मुळा, मिरची, आलं, लसूण, लाल तिखट, मीठ, हळद, बडीशेप, काळी मिरी, तेल, मोहरीची डाळ या साहित्याचा वापर करण्यात आला यामधून मुलांनी पुरविणे ही प्रक्रिया अभ्यासली.














Thursday, 25 November 2021

NOVEMBER 2021

 

शाळेचे नाव-सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल,केंदूर


इयत्ता -दहावी

 विभागाचे नाव- ऊर्जा पर्यावरण विषयाचे नाव- एक दिवा एका स्विच ने दोन दिवे दोन स्विच नी नियंत्रित करणे.

इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या वर्गावर एक दिवा एका स्विच ने दोन दिवे दोन स्विच नियंत्रीत करणे या विषयावर लेक्चर झाले. यामध्ये सर्वप्रथम विद्यार्थ्यांना वायरिंग बद्दल संपूर्ण माहिती दिली. स्वीच चे वेगवेगळे प्रकार सांगून त्या बद्दल माहिती दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांकडून एक दिवा एका स्विच ने जोडून घेतला तसेच विद्यार्थी दोन दिवे दोन स्विच नियंत्रीत करायलाही शिकले. विद्यार्थ्यांनी खूप व्यवस्थितपणे सर्किट बनवली यामध्ये एकूण खर्च 125 रुपये इतका आला. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या सर्व शंकांचे निरसन झाले. तसेच विद्यार्थ्यांना या प्रॅक्टिकल बद्दल सर्व कन्सेप्ट क्लियर झाल्या.







इयत्ता-आठवी

प्रात्यक्षिकाचे नाव - पणत्या रंगविणे.

थोडक्यात माहिती - दीपावली येताच घरोघरी पण त्यांचे दिवे लावलेले असतात. त्यामुळे पण त्यांना सजावट करण्यासाठी कलर वेगवेगळ्या प्रकारचे मोती स्टार वापरण्यात आले. त्यासाठी बाजारातून पणत्या आणल्या त्यांना वेगवेगळ्या कलर ने डिझाईन काढण्यात आले गम वापरून त्यावर कुंदन तसेच मोती डेकोरेट करण्यात आले.








प्रात्यक्षिकाचे नाव - शेंगदाणा चिक्की बनविणे.

थोडक्यात माहिती - किशोरवयीन मुलामुलींमध्ये काही वेळेस हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असते. त्यामुळे आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यासाठी गुळ शेंगदाणे खाणे अत्यंत आवश्यक असते. त्यामुळे आपल्या शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते. त्यासाठी गूळ शेंगदाण्याची चिक्की बनविण्यात आली. त्यासाठी गुळ शेंगदाणे तूप इत्यादी साहित्य वापरण्यात आले. शेंगदाणे खरपूस भाजून त्याची टरकले काढली नंतर मिक्सर मध्ये शेंगदाणे बारीक करून घेतले. कढईमध्ये गुळाचा पाक करून त्यामध्ये बारीक केलेले शेंगदाणे मिक्स करून घेतले. ताटाला तूप लावून त्यामध्ये हे मिश्रण ओतले व्यवस्थित पसरून त्याच्या वड्या पाडल्या यामधून मुलांनी पाकाचे प्रकार अभ्यासले.




प्रात्यक्षिकाचे नाव _जमीन तयार करणे शेतात मेथी पीक घेणे विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतील प्लॉटवर मीटर च्या साह्याने मोजणी करून घेतली जमिनीमध्ये सारा तयार केला टिकावा च्या साह्याने खोदने केली गवत दगड वेचून काढले बीज प्रक्रिया केलेली मिठी त्या जागेत हाताने टाकने केले पुन्हा पंजाची साह्याने पूर्ण मातीत मिसळून घेतले त्याला पाणी दिले आंतरपिकाची लागवड केली उदाहरणार्थ कोथिंबिरीचे बी मुळा बी हे आंतरपीक वर अंबेने लावगड केली त्याला दोन-तीन दिवसांनी पाणी दिले अशा पद्धतीने शेत जमीन तयार करून मेथीचे पीक घेतले प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी केले त्यातून विद्यार्थ्यांना खूप आनंद मिळाला तसे नफा-तोटा पत्रक विद्यार्थ्यांना बनवता येते अशा पद्धतीने हे प्रात्यक्षिक पूर्ण केले








प्रात्यक्षिकाचे नाव- अर्धा गुंठा क्षेत्रावर मेथीचे पीक घेणे

विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेच्या प्लॉटवर मेथी या पिकाची जमीन तयार केली टिकवा च्या साह्याने जमीन खोदणी करून घेतली त्यानंतर त्यामध्ये सारे तयार केले मेथी बी यावर बीज प्रक्रिया केले बीजप्रक्रिया केलेले बियाणे त्यावर बियाणांची टाकणी केली त्याला पाणी दिले अशा पद्धतीने दोन दिवसांनी पुन्हा त्याला पाणी दिले 28 दिवसांमध्ये मेथीचे पिक काढण्यासाठी तयार झाले इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी मी तिची काढणे केली ते शाळेमध्येच विक्री केले हे प्रात्यक्षिक करताना विद्यार्थ्यांना दोनशे रुपये खर्च आला या पिकातून दोनशे पंधरा रुपये उत्पन्न मिळाले त्यातून विद्यार्थ्यांना 15 रुपये नफा झाला अशा पद्धतीने हे प्रात्यक्षिक पूर्ण विद्यार्थ्यांनी केले नफा तोटा पत्रक विद्यार्थ्यांनी काढले हे प्रात्यक्षिक करताना विद्यार्थ्यांना खूप आनंद आवड निर्माण झाली.

 











                                                                  अभियांत्रिकी विभाग.                                                      ...