वाचन प्रेरणा दिन दि.15 आँक्टोबर 2018 , माजी राष्ट्रपती , महान शास्त्रज्ञ
डाँ.ए.पी.जे.अब्दूल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिना निमित्त विदयालयात
सोमवार ,दि.15 आँक्टोबर 2018 रोजी ग्रंथ दिंडी काढण्यात आली. यानिमित्ताने विदयालयात ग्रंथ
प्रदर्शन भरविण्यात आले , या प्रदर्शनाचे उदघाटन प.स.सदस्या् शिरुर सौ.सविताताई प-हाड याच्या
हस्ते झाले , यावेळी संस्थेचे पुणे विभागीय सदस्य मा.सदाशिवराव थिटे व मा.रामशेठ
साकोरे ,केंद्रप्रमुख मा. गणेश गायकवाड ,समाजसेवक मा. श़करराव काटे ,विदयालयाचे
प्राचार्य श्री.एम.डी. बेले सर,
पर्यवेक्षक श्री.आर.बी.जाधव सर ,ग्रंथपाल श्री.मनोज
दोंड ,विदयालयातील शिक्षक-शिक्षकेत्तर सेवक ,ग्रामस्थ , विदयार्थी-
विदयार्थीनी उपस्थित होते.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित
Monday, 15 October 2018
सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल, केंदूर
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था
कोल्हापूर संचलित 'सरदार रघुनाथराव ढवळे
हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज ,केंदूर मधे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार
साळुंखे ,प्राचार्य सुळगेकर सर, पुणे विभाग प्रमुख प्राचार्य गवळी एस
.एम. सर यांची उपस्थिती शुक्रवार दिनांक बारा ऑक्टोबर 2018 रोजी लाभली.या
कार्यक्रमाच्या निमित्ताने शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीराव आढळराव
पाटील हेही उपस्थित होते संस्था आणि खासदार फंड या निधीतून शालेय वर्ग खोलींचे
भूमिपूजन करण्यात आले.
संस्था माता आणि बापूजींच्या प्रतिमा
पूजनाने कार्यक्रम सुरू झाला.या कार्यक्रमांमध्ये कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार
साळुंखे यांनी दलित मित्र बापूजी साळुंखे यांच्या कार्याची माहिती दिली .तसेच
संस्थेच्या शैक्षणिक संकुल संबधी माहिती दिली. ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार या
संस्थेचा बि्द वाक्यानुसार गुरुदेव कार्यकर्त्यांचे काम चालू आहे.यांची उपस्थितांना जाणीव
करून दिली.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने संस्था
विभागीय सदस्य माजी सभापती सदाशिवराव थिटे , रामशेठ साकोरे प्राचार्य बेले एम .डी. सर तसेच शाळा
व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष तुकारामशेठ सुकरे, स्कूल कमिटी चेअरमन पांडुरंग दादा
ताथवडे ,आंबेगाव पंचायत समिती सदस्य रवींद्रशेठ करंजखेले, माजी जिल्हा परिषद
सदस्या जयश्रीताई पलांडे ,
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अरुण भाऊ
गिरे, उपसरपंच अभिजीतशेठ साकोरे, शिवसेना शाखाध्यक्ष जयदीप शेठ ताठे, शिरूर आंबेगावमधील
शिवसेना कार्यकर्ते, तसेच केंदूर आणि परिसरातील आजी माजी पदाधिकारी ग्रामस्थ , प्रशालेतील
वेगवेगळ्या विभागातील अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक ,स्कूलचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी
उपस्थित होते.
Tuesday, 25 September 2018
सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल, केंदूर ,आयबीटी स्वच्छतेचे महत्त्व व परिसर स्वच्छता
स्वच्छतेचे महत्त्व
व परिसर स्वच्छता
स्वच्छ सुंदर
परिसर आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे आयबीटी प्रकल्पांतर्गत सर्व विभागातील
मुलांनी ,
शाळेतील पन्नास
मुले या सर्वांनी केंदूर बाजारतळ परिसर स्वच्छ केला सोमवारी 24/9/2018 रोजी बाजार होता .
त्या आठवडे
बाजारातील कचरा मुलांनी दुसऱ्या दिवशी 25/9/2018 रोजी साफ केला. तसेच मुलांनी सर्वांनी मिळून
स्वच्छतेचे महत्त्व सांगणारी फेरी रॅली काढली होती. या फेरीच्या माध्यमातून
मुलांनी स्वच्छतेविषयी घोषणा दिल्या.
Friday, 7 September 2018
Tuesday, 4 September 2018
Subscribe to:
Posts (Atom)
अभियांत्रिकी विभाग. ...
-
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित 'सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज ,केंदूर...
-
माध्यमिक उच्च माध्यमिक संघ शिरूर हवेली यांच्याकडून उपक्रमशील शाळा पुरस्कार दिनांक 14 ऑक्टोबर 2018 रोजी स्वीकारताना सरदार रघु...





























