"ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार " शिक्षणमहर्षि प. पू . डॉ.बापूजी साळुंखे .

Friday, 20 August 2021

AUGEST2021

शाळेचे नाव सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल,केंदूर

ऊर्जा  पर्यावरण

इयत्ता- नववी

विभागाचे नाव -ऊर्जा पर्यावरण

उपक्रमाचे नाव -विद्युत साधने हत्यारांची ओळख सांकेतिक चिन्हे

      इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांच्या वर्गावर विद्युत साधने, हत्यारांची ओळख सांकेतिक चिन्हे यावर ऑनलाइन लेक्चर झाले. विद्यार्थ्यांना हत्यारांची ओळख करून दिली. त्यांचा वापर कसा करायचा आणि कुठे करायचा हे सांगितले. विद्युत साधने हाताळताना घ्यावयाची काळजी निगा यांची माहिती दिली. विद्यार्थ्यांना विद्युत क्षेत्राशी संबंधित सांकेतिक चिन्हांचा वापर कसा करावा आणि कुठे करावा याचेही ज्ञान मिळाले. विद्यार्थ्यांना या विषयातून विद्युत साधने आणि उपकरणे यांची ओळख कळाली तसेच त्यांचा वापर आणि वापर करताना घ्यावयाची सुरक्षा काळजी तसेच उपाययोजना या सर्वांची माहिती मिळाली. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन होऊन ऑनलाइन लेक्चर संपले.       

 





गृह आरोग्य

इयत्ता - वी

 प्रात्यक्षिकाचे नाव - नानकेट बनविणे.

गृह आरोग्य विभागांतर्गत प्रात्यक्षिक करताना भाजणे ही प्रक्रिया अभ्यासत असताना नानकेट बनविले. त्यासाठी मैदा, तूप, पिठीसाखर, बेकिंग पावडर, व्हेनिला इसेन्स, . साहित्य वापरले.

कृती - प्रथम मैदा, पिठीसाखर, तूप एकत्र करून ते व्यवस्तीत मिक्स करा. नंतर व्हेनीला इसेन्स बेकिंग पावडर टाका छोटे छोटे गोल आकारात नानकेट बनवून घ्या ट्रे ला आतून तूप लावून घ्या. नानकेटामध्ये अंतर ढेऊन ओव्हन मध्ये १८०°c तापमानाला २५ मिनिटाला ढेवा. यामधून मुलांनी भाजणे ही प्रक्रिया अभ्यासली.



शेती व पशुपालन

इयत्ता - 8 वी

प्रात्यक्षिकाचे नाव- जमिनीचे क्षेत्रफळ मोजणे

 त्यामध्ये गुंठा एकर हेक्टर इयत्ता आठवी चे विद्यार्थी एक गुंठ्याचे क्षेत्रफळ काढणे शिकले. त्यामध्ये 33 बाय 33 एक गुंठा 40 गुंठे यांचा एक एकर अडीच एकर एक हेक्टर पूर्ण परिमाणे काढण्यास शिकले.






अभियांत्रिकी


इयत्ता-नववी 

उपक्रमाचे नाव-बाज तयार करणे.

साहित्य-मेजरिंग टेप, गुण्या, मार्कर, वेल्डिंग राॅड.

साधन-कटींग मशिन, वेल्डिंग मशिन.

कृती-प्रथम आम्ही मुलांना ×२टयुब घेऊन त्याची साईज या बद्दल माहिती दिली.नंतर२×२टयुब चे १८" नग कटिंग करुन फुटांचे नग कटिंग केले फुटांचे २नग कटिंग केले. कोपरे एकत्र करून प्रथम वेल्डिंग केले.त्याचे गुण्या काढून वेल्डिंग पुर्ण भरले नंतर पाय व्यवस्थित वेल्डिंग केले.अशाप्रकारे बाज तयार करून मुलांना माहिती दिली .

लोकोपयोगी सेवेचे नाव-बाज तयार करणे.

खर्च-३००

नफा-२००






प्रात्यक्षिकाचे नाव _ बीज प्रक्रिया करणे विद्यार्थ्यांना आपल्या घरच्या शेतात शाळेचे प्लॉटवर कोणतही पिक घेण्याचे म्हटलं तरी या बियाणांवर वेळोवेळी रासायनिक जैविक पद्धतीने बीजप्रक्रिया करावी लागते बीज प्रक्रिया करत असताना बुरशीनाशक औषध पावडर गुळा चे पाणी  समप्रमाणात वापरावे बीज प्रक्रिया फायदे तोटे विद्यार्थ्यांना स्पष्ट करता येतात उत्पादनामध्ये होणारी वाढ मरण्याचे प्रमाण कमी होते सर्व बाबींचा विचार करून बीज प्रक्रिया चे अशा पद्धतीने बीज प्रक्रिया फायदे विद्यार्थी स्पष्ट करतात अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी बीज प्रक्रिया हे प्रात्यक्षिक आपल्या शाळेमध्ये केले सर्वांनी त्यामध्ये सहभाग घेतला आनंद व्यक्त केला









JULY2021

 शाळेचे नाव- सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल केंदुर

गृह आरोग्य

प्रात्यक्षिकाचे नाव - मंचुरीयन बनवणे.

इयत्ता -  वी

थोडक्यात माहिती - अन्नपदार्थ बनविण्याच्या प्रक्रियेमध्ये मंचूरियन बनविण्यात आले त्यासाठी लागणारे साहित्य कोबी, शिमला मिरची, हिरवी मिरची, मीठ, तेल, मैदा, कॉर्न फ्लावर, गाजर, मंचुरियन मसाला, बेकिंग पावडर, कांद्याची पात, .

 कृती - प्रथम कोबी, गाजर, शिमला मिरची, बारीक चिरून घ्या. त्यामध्ये मैदा, कॉर्नफ्लोअर, मीठ, बेकिंग पावडर टाकून थोडे थोडे पाणी टाकून पीठ मळून घ्या. त्याचे छोटे छोटे गोळे बनवून तळून घ्याा. कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये कांदा टाकून त्यावर मंचूरियन मसाल्याचे मिश्रण टाका त्यावर कांदा पात कापून टाका. चटपटीत मंचुरियन तयार होईल.



ऊर्जा पर्यावरण

इयत्ता- दहावी

विभागाचे नाव ऊर्जा पर्यावरण

 उपक्रमाचे नाव- विद्युत तंत्रज्ञानाची ओळख प्रात्यक्षिके

          इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या वर्गावर विद्युत तंत्रज्ञानाची ओळख प्रात्यक्षिके या विषयाचे ऑनलाइन सेशन झाले .त्यामध्ये विद्यार्थ्यांना विजेचे महत्त्व समजावून सांगितले. विद्युत तंत्रज्ञानातील मूलभूत संकल्पना समजावून सांगितल्या. यातून विद्यार्थी ट्रांजिस्टर चे कार्य महत्व उपयोग शिकले .तसेच कॅपॅसिटर चे ही कार्य संकल्पना मुलांना समजल्या ,यातून विद्यार्थी ओहमचा नियम ही शिकले. विद्यार्थ्यांना करंट चे प्रकार त्याचे कार्य समजावून सांगून एकसर जोडणी समांतर जोडणी कशी करावी तसेच त्यातील फरकही सांगितला. यामध्ये विद्यार्थ्यांना विविध तंत्रज्ञान यांची ओळख झाली   त्यांस कडून लहान-मोठे प्रात्यक्षिके देखील करून घेतली. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या सर्व शंकांचे निरसन करून ऑनलाईन सेशन संपले.





शेती

प्रात्यक्षिकाचे नाव- साहित्य साधनांची ओळख, उपयोग

 विद्यार्थ्यांना शेती विभागात असणाऱ्या विविध साहित्य अवजारे यंत्राची माहिती करून दिली त्यानंतर या साहित्यांचा शेतीमध्ये उपयोग केल्यानंतर होणारे फायदे स्पष्ट केले विद्यार्थ्यांना अवजारांची काळजी कशी घ्यावी याची पूर्ण माहिती समजून सांगितली त्यानंतर मातीचे गुणधर्म अभ्यासले साहित्यांचे उपयोग स्पष्ट करून सांगितले






शाळेचे नाव-सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल,केंदूर

इयत्ता-आठवी

उपक्रमाचे नाव-शेडचे पोल उभे करणे.

साहित्य- मेजरींग टेप,ओळंबा,लेवल टूब,मार्कर,लाईन दोरी.

कृती-प्रथम आम्ही मुलांना माहिती दिली. नंतर आम्ही शेंडी लांबी, रुंदी काढली. ×./ अशी C चॅनल ची साइज घेऊन १० फुटाचे नग कटिंग केले.योग्य मापात खड्डे घेऊन पोल उभे केले.लेवलटूब ने दोन्ही पोलची लेवल काढली.अशा प्रकारे मुलांना माहिती देऊन पोल उभे केले.

लोकोपयोगी सेवेचे नाव-पोल उभे करणे.

खर्च-५०

नफा-१५०



Friday, 13 August 2021

JUNE2021

  केक बनविणे:

थोडक्यात माहिती - अन्नपदार्थ बनविण्याच्या प्रक्रियेमध्ये पदार्थ भाजणे ही प्रक्रिया अभ्यासत असताना केक बनविण्यात आला. त्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे पारलेजी बिस्किट पॅकेट, दूध, बेकिंग पावडर, व्हेनीला इसेंन्स, इत्यादी.

कृती - प्रथम बिस्किटाचे तुकडे करून ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतले. नंतर त्यामध्ये पिठी साखर, बेकिंग पावडर, व्हॅनिला इसेन्स व दूध टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतले एका गोल डब्यात आतून तेल लावून त्यामध्ये हे मिश्रण ओता व ओव्हनमध्ये १८०°c तापमानाला ठेवा. केक तयार झाल्यानंतर तो बाहेर काढा. यामधून मुलांनी भाजणे ही प्रक्रिया अभ्यासली. ओहन नसेल तर कुकर मध्ये केक बनवू शकतो.   




ऊर्जा  पर्यावरण

इयत्ता -नववी

उपक्रमाचे नाव- वायर गेज मोजणे

विभागाचे नाव- ऊर्जा पर्यावरण

      इयत्ता नववीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे वायर गेज या विषयावर ऑनलाईन प्रशिक्षण झाले. यामध्ये विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या तारा ,वायर ,केबल दाखविण्यात आल्या. प्रत्येक तारांची केबल ची ओळख करून दिली. विद्यार्थ्यांना वायर गेज म्हणजे काय? ते कसे मोजतात? मोजण्यासाठी कोणते टूल वापरतात हे सर्व सांगितले. त्यातून टूल बद्दल संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना कळाली त्याचा वापर कसा करावा हे देखील कळाले. कंडक्टर वायर मधून आणि केबल मधून तार व्यवस्थित काढणे तसेच वायर गेज हाताळणे हे सर्व विद्यार्थ्यांना समजले. विद्यार्थ्यांना वायर गेज स्टॅंडर्ड टूल ने मोजून दाखविले. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन होऊन सेशन संपले 





.

                    

Thursday, 1 April 2021

MARCH 2021

 आभियांत्रिकी विभाग 


उपक्रमाचे नाव-बिजागिरी वेल्डिंग करणे
साहित्य-मेजरींग टेप, मार्कर, अॅप्रॉन, वेल्डिंग गॉगल, वेल्डिंग मशिन.
कृती-प्र‌थम मुलांना माहिती देऊन दरवाजाची बिजागिरी तुटलेली होती ती ग्राईडिंग मशिन घ्या साहाय्याने काढून घेतली व ४इंचा ची नवीन वेल्डिंग केली अशा प्रकारे तुटलेले पार्ट कसे काढणे,कसे वेल्डिंग करावे मुलांच्या लक्षात आले व आनंद झाला, माहिती मिळाली.
लोकोपयोगी सेवेचे नाव-बिजागिरी वेल्डिंग करणे ‌.
खर्च-३००₹
नफा-१५०₹






ग़ृह व  आरोग्य विभाग 

उपक्रमाचे नाव - बटाटे वडे बनविणे. 
साहित्य - पाव, बटाटे, बेसनपीठ, तेल, मीठ, मिरची, आलं, लसूण, कोथींबीर, इ. 
कृती - प्रथम बटाटे उकडून व साले काढून व कुस्करून घ्या. त्यामध्ये बारीक वाटलेले आले, लसूण, मीठ, मिरची, हळद मिक्स करावे. त्यावर बारीक चिरलेली कोथींबीर टाकावी व ह्या मिश्रणाचे गोळे करून चपटे करावे. त्यानंतर बेसनपीठात पाणी थोडे  टाकून मिक्स करून घ्या. त्यानंतर गोळे बेसनपीठात बुडऊन गरम तेलातून टाळून घ्या. हइ बटाटे वडे पावा सोबत सर्व्ह करा. यामधून मुलांनी तळणे हि प्रक्रिया अभ्यासली. 





 




 उपक्रमाचे नाव - बेसन पिठाचे लाडू बनविणे. 
साहित्य - बेसनपीठ, साखर, तेल, विलायची, ड्रायफ्रूट, इ. 
कृती -  प्रथम बेसनपीठ पाण्यामध्ये मळून घ्यावे. व त्याच्या पुऱ्या करून घ्या. पुऱ्यांचा बारीक  भुगा करून घ्या. पातेल्यामध्ये साखरेचा पाक तयार घ्या. पाक तयार झाल्यावर त्यामध्ये पुऱ्यांचा भुगा टाकावा. ही मिश्रण थंड झाल्यावर त्याचे माध्यम आकाराचे लाडू  बनवून घ्या. अशाप्रकारे मुलांनी पाक कसा बनवायचा ही अभ्यासले.  

FEBRUARY 2021

 आभियांत्रिकी  विभाग 

उपक्रमाचे नाव–चप्पल स्टँड तयार करणे 
साहित्य – मेजरिंग टेप ,मार्कर, हॅण्ड ग्लोव्हज , वेल्डिंग रॉड, गॉगल
साधने–वेल्डिंग मशीन,कटिंग मशीन
कृती –प्रथम मुलांना माहिती देऊन 8मम चे बार घेतले ते आम्ही मशीन द्वारे कट्टिंग केले नंतर आम्ही ते ग्रिंडींग केले बेंड झालेले बार हतोडीचा वापर करून सरळ करून व्यवस्थित केले 
नंतर आम्ही प्रथम 1 फुटाचे 12 नग कटिंग केले ते कटिंग केलेले बारचे पहिला चौकोन केले व पाय जोडले आणि नंतर पेंटींग केले 
अश्या प्रकारे काम पूर्ण केले 
लोकोपयोगी सेवेचे नाव –चप्पल स्टँड तयार करणे 
खर्च–400रुपये 
नफा –150रुपये







उपक्रमाचे नाव-गाईचे दुध काढण्यासाठी स्टुल तयार करणे
साहित्य-मेजरींग टेप, मार्कर, हातोडी, वेल्डिंग गॉगल 
कृती-प्रथम आम्ही मुलांना माहिती देऊन मेजरींग टेप ने लांबी रुंदी स्टूलची घेतली २५×३चे अॅगल घेतले मुलांनी ते१फुटांचे ४नग कटींग केले प्रथम फ्रेम बनविली गुण्याच्या साह्याने पाय वेल्डिंग केले अशा प्रकारे स्टुल बनविला.
लोकोपयोगी सेवेचे नाव-गाईचे दुध काढण्यासाठी स्टुल चा उपयोग झाला.
खर्च-१००₹
नफा-५०₹






ग़ृह व आरोग्य  विभाग 

उपक्रमाचे नाव -   गृह आरोग्य विभागात घ्यावयाच्या दक्षता.
थोडक्यात माहिती - गृह  आरोग्य विभागात कृती करत असताना पुढील दक्षता घ्याव्या - 
1) अन्न पदार्थ तयार करत असताना अप्रोन व कॅप घालावी. 
2) हात स्वछ धुऊन घ्यावेत. 
3) वापरात येणारे साहित्य धुऊन घयावे. 
4) गरम भांडी पकडताना पक्कड वापरावी. 
5) वेगवेगळ्या पदार्थाला वेगवेगळा चमचा वापरावा. 
6) गृह आरोग्य विभाग सोडताना फॅन व गॅस चे स्विच बंद करावे. 
अशा प्रकारे काळजी घ्यावी. 




उपक्रमाचे नाव - साबुदाणा खिचडी बनविणे. 
साहित्य - साबुदाणे, शेंगदाणे, बटाटे, मिरची, मीठ, तेल, इ. 
कृती - प्रथम साबुदाणे भिजवून व बटाटे उकडून घ्यावेत.  तसेच शेंगदाणे भाजून त्याचा बारीक कूट करून घ्यावा. गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकावे. तेल गरम झाल्यानंतर कापलेली हिरवी मिरची टाकावी व नंतर शाबुदाणे टाकून चमच्याने हलवून घ्यावे नंतर बटाटा बारीक  कुस्करून टाकावा  व शेंगदाण्याचा कूट टाकावा चवीनुसार मीठ टाकावे व व्यवस्थित खिचडी गरम करून घ्यावी. यामधून मुलांनी अन्नपदार्थ बनविण्याच्या प्रक्रियेमध्ये वाफविणे ही प्रक्रिया अभ्यासली. 










                                                                  अभियांत्रिकी विभाग.                                                      ...