जुलै 2020
विभाग : शेती
इयत्ता आठवी च्या मुलांनी तयार केलेल्या शेती जमिनीमध्ये वांग्याच्या रोपांची लागवड केली .सर्वप्रथम मुलांनी सरी पाडली त्या सरीवर तीन फूट अंतरावर ती वांग्याच्या रोपांची लागवड केली .शेतजमीन तयार करत असतानाच मुलांनी शेतजमिनी मध्ये शेणखत टाकले होते .तयार झालेले या उपक्रमाचे संदर्भात मुलांनी वहीमध्ये व्यवस्थितरित्या लिहून सुद्धा घेतले .
उपक्रमाचे नाव-ग्रिल बनवणे
साहित्य-मेजरींग टेप, हातोडी,मार्कर, छणी, अॅप्राॅन, वेल्डिंग रोड,गाॅगल.
कृती-प्रथम आम्ही मुलांना माहिती दिली मेजरींग टेप ने लांबी रुंदी काढली १×१ची स्क्वेअर टयुब घेतली ती ५फुट चे २ नि कटींग केली नंतर ६फुट चे ३नग कटींग केले व ८एमएम चे बार घेऊन योग्य मापात कटींग केले प्रथम फ्रेम बनविली नंतर बार ४इंचावर एक वेल्ड केला अशा पध्दतीने ग्रिल बनविले.
लोकोपयोगी सेवेचे नाव-ग्रिल बनवणे.
खर्च-१००₹ इ.नफा.
1) उपक्रमाचे नाव - उपवासाचा चिवडा बनविणे.
साहित्य - बटाट्याचा किस, नायलॉन शाबूदाणे, शेंगदाणे, हिरवी मिरची, तेल, मीठ, इ.
कृती - गॅसवर कढई ढेऊन त्यामध्ये तेल ओता. तेल गरम झल्यावर त्यामध्ये शाबूदाणे टाळून घ्या. नंतर किस तळून घ्या. त्यानंतर शाबूदाणे तळून घ्यावे. व हिरव्या मिरचिचे तुकडे करून तळून घ्यावे. हे सर्व एकत्र मिक्स करून त्यावरून चवीनुसार मीठ टाकावे. याप्रमाणे चिवडा तयार होतो. यामधून मुलांनी तळणे हि प्रक्रिया अभ्यासली.






No comments:
Post a Comment