"ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार " शिक्षणमहर्षि प. पू . डॉ.बापूजी साळुंखे .

Wednesday, 31 March 2021

जुलै 2020


जुलै 2020

विभाग : शेती

इयत्ता आठवी च्या मुलांनी तयार केलेल्या शेती जमिनीमध्ये वांग्याच्या रोपांची लागवड केली .सर्वप्रथम मुलांनी सरी पाडली त्या सरीवर तीन फूट अंतरावर ती वांग्याच्या रोपांची लागवड केली .शेतजमीन तयार करत असतानाच मुलांनी शेतजमिनी मध्ये शेणखत टाकले होते .तयार झालेले या उपक्रमाचे संदर्भात मुलांनी वहीमध्ये व्यवस्थितरित्या लिहून सुद्धा घेतले .




उपक्रमाचे नाव-ग्रिल बनवणे
साहित्य-मेजरींग टेप, हातोडी,मार्कर, छणी, अॅप्रा‌ॅन, वेल्डिंग रोड,गाॅगल.
कृती-प्रथम आम्ही मुलांना माहिती दिली मेजरींग टेप ने लांबी रुंदी काढली १×१ची स्क्वेअर टयुब घेतली ती ५फुट चे २ नि कटींग केली नंतर ६फुट चे ३नग कटींग केले व ८एमएम चे बार घेऊन योग्य मापात कटींग केले प्रथम फ्रेम बनविली नंतर बार ४इंचावर एक वेल्ड केला अशा पध्दतीने ग्रिल बनविले.
लोकोपयोगी सेवेचे नाव-ग्रिल बनवणे.
खर्च-१००₹ इ.नफा.



1) उपक्रमाचे नाव - उपवासाचा चिवडा बनविणे. 
साहित्य - बटाट्याचा किस, नायलॉन शाबूदाणे, शेंगदाणे,  हिरवी मिरची, तेल, मीठ, इ. 
कृती - गॅसवर कढई ढेऊन त्यामध्ये तेल ओता. तेल गरम झल्यावर त्यामध्ये शाबूदाणे टाळून घ्या. नंतर किस तळून घ्या. त्यानंतर शाबूदाणे तळून घ्यावे. व हिरव्या मिरचिचे तुकडे करून तळून घ्यावे. हे सर्व एकत्र मिक्स करून त्यावरून चवीनुसार मीठ टाकावे. याप्रमाणे चिवडा तयार होतो. यामधून मुलांनी तळणे हि प्रक्रिया अभ्यासली. 




Friday, 26 March 2021

AUGUST 2020

 

इयत्ता: आठवी उपक्रमाचे नाव : शेत जमीन तयार करणे .

इयत्ता आठवी च्या मुलांनी शेतजमीन तयार करण्यासाठी आवश्यक ते साहित्य घेऊन शेत जमिनी मध्ये गेले. टिकाव, खोरे यांच्या साह्याने त्यांनी सर्वप्रथम जमीन खोदून काढलीखोदून काढलेल्या जमिनीमधील दगड , गवत मुलांनी हाताने उचलून बाजूला टाकले .खोदलेल्या जमिनीवरची मुलांनी खोर्याच्या साह्याने सरी पाडून घेतली .केलेली सर्व कृती मुलांनी वहीमध्ये व्यवस्थितपणे लिहून घेतली.

 







उपक्रमाचे नाव - मास्क बनविणे.
साहित्य - सुई, दोरा, इलॅस्टिक, कापड, कात्री, मेजर टेप, इ. 
कृती - मेजर टेप ने 20 × 20 चे कापड मोजून घ्या. नंतर सुई दोरा घेऊन कापड चारही बाजूने दुमडून शिवून घ्या व समान अंतरावर दोन्ही बाजूने दोन दोन चुण्या मारून घ्या. नंतर आपल्याला व्यवस्थित वाटेल अशा मापाचे इलॅस्टिक कापून दोन्ही बाजूने शिवून घ्यावे. कोरोनापासून आपल्याला संसर्ग होऊ नये म्हणून मास्क वापरणे गरजेचे आहे. त्यामुळे आपण घरच्या घरी मास्क कसे बनवू शकतो. ही मुलांनी प्रत्यक्ष मास्क बनवून शिकवन घेतली. 











उपक्रमाचे नाव–शाळेतील टॉयलेट पत्रा फिटिंग
साहित्य–मेजरींग टेप, गुण्या, कात्री ,हांड ग्लोव्हज,पोगर,हातोडी
कृती–प्रथम आम्ही मुलांना माहिती दिली ,खराब झालेले पत्रे काढून नवीन पत्रे फिट्टींग केले त्यासाठी प्रथम लांबी×रुंदी काढली 
40 गेजच्या पत्रा घेतला, 7 फुटाचे पत्रे कट्टींग करून व्यवस्थित पत्रे फिटींग केले 
अश्याप्रकारे पत्रे फिटिग केले 
लोकोपयोगी सेवेचे नाव –शाळेतील संडास बाथरूमचे पत्रे फित्तिंग केले 
खर्च–200रुपये इतका झाला 
नफा –100रुपये







Tuesday, 14 April 2020

शेती जमीन तयार करणे .

 शेती जमीन तयार करणे .
इयत्ता आठवी च्या मुलांनी शेतजमीन तयार करण्यासाठी आवश्यक ते साहित्य घेऊन शेत जमिनी मध्ये गेले. टिकावखोरे यांच्या साह्याने त्यांनी सर्वप्रथम जमीन खोदून काढली .  खोदून काढलेल्या जमिनीमधील दगड गवत मुलांनी हाताने उचलून बाजूला टाकले .खोदलेल्या जमिनीवरची मुलांनी खोर्‍याच्या साह्याने सरी पाडून 
घेतली .केलेली सर्व कृती मुलांनी वहीमध्ये व्यवस्थितपणे लिहून घेतली.

बेंच दुरुस्ती करणे.

बेंच दुरुस्ती करणे.
इयत्ता :आठवी
स्क्रू विषयी माहिती शाळेतील मुलांना माहिती देऊन कोण कोणत्या प्रकारचे स्क्रू कसे फिटिंग दीलींग करून घ्यायचे माहिती दिली तुटलेला बेंच  दुरुस्ती वेल्डिंग केले व मुलांनी सहा एम एम चे ड्रिलिंग फळी वरती करून फिटिंग केले .
तुटलेले पाय वेल्डिंग केले  3:15 या साइज वापरला व योग्य मापात फळी कटिंग केले व्यवस्थित रित्या बेंच रिपेरिंग केल्या.अशाप्रकारे बेंच दुरुस्ती केली. लोकोपयोगी सेवेचे नाव शाळेतील बेंच  दुरुस्ती करणे खर्च 100 रुपये नफा 50 रुपये झाला.



मसाला डोसातयार करणे.

मसाला डोसा
इयत्ता - 8वी
अन्न पदार्थ बनविण्याच्या प्रक्रियेमध्ये वाफविणे ही प्रक्रिया अभ्यासताना मसाला डोसा बनविण्यात आला. त्यासाठी तांदूळउडीददाळहरभरा डाळबटाटालाल मिरचीहळदजीरीमोहरीमिठतेलगरम मसाला इ. साहित्य वापरण्यात आले.तांदूळ व डाळी ते तास भिजवून ठेऊन ते वाटून घेतले. बटाटे उकडून घेऊन ते सोलून कुस्करून घेतले. कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये जीरीमोहरीहळदलाल मिरची तसेच मीठ टाकून व्यवस्थित परतून घेतले. गॅसवर पॅन ठेवून त्यावर तांदळाचे मिश्रण पातळ ओतून त्यावर बटाटय़ाचे मिश्रण पसरवून घेतले व ब्राऊन कलर आल्यावर काढून घेतले.

मेथीच्या जुडीची विक्री करणे .

मेथीच्या जुडीची विक्री करणे .
इयत्ता आठवीच्या मुलांनी मेथीचा जुडीची विक्री करण्यासाठी सर्वप्रथम रानातील मेथी उपटली सुतळीच्या साह्याने ती मेथी बांधून घेतली .एकूण अकरा  मेथीची जुडी निघाली .पाच रुपये याप्रमाणे विक्री केली .55 रुपये इतके मेथीच्या जुड्यांचे पैसे झाले .या मेथीच्या जुड्यांची विक्री शाळेतील शिक्षकांना केली .खर्च वजा जाता वीस रुपये इतका नफा झाला .या उपक्रमाच्या साह्याने मुलांना  प्रत्यक्ष  माल शेतीमधून विक्रीसाठी बाजारामध्ये कसा नेतात आणि विक्री केल्यानंतर त्याचा हिशोब मुलांना ठेवता आला .या उपक्रमाचे सर्व इत्थंभूत माहिती मुलांनी व्यवस्थितरित्या वहीमध्ये लिहून घेतली.




समोसे बनविने.


समोसे बनविने
अन्न पदार्थ बनविण्याच्या पद्धती पाच आहेत्यामध्ये तळणेभाजणेउकडणेशिजविणेवाफविणे हे प्रकारयेतातसमोसे बनविताना मुलांनी उकडणेतळणे या दोन प्रक्रिया अभ्यासल्यात्यामध्ये बटाटेवटाणा
मिरचीगरम मसालामैदातेलमीठलसूणहळदओवाआलं पदार्थ वापरलेत्यापासून शंकू आकाराचे समोसे बनविण्यात आलेत्यासाठी एकूण 100रुखर्च आलाएकूण 20 समोसे तयार झालेप्रत्येकी 8रू
प्रमाणे विक्री केली असता 160रूझाले.



                                                                  अभियांत्रिकी विभाग.                                                      ...