"ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार " शिक्षणमहर्षि प. पू . डॉ.बापूजी साळुंखे .

Saturday, 20 October 2018

सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल, केंदूर




माध्यमिक उच्च माध्यमिक संघ शिरूर हवेली यांच्याकडून उपक्रमशील शाळा पुरस्कार दिनांक 14 ऑक्टोबर 2018 रोजी    स्वीकारताना सरदार रघुनाथराव ढवळे  हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज केंदूरचे प्राचार्य आणि स्टाफ.
     हा पुरस्कार ब्रिगेडियर विक्रम प्रताप गायकवाड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी शिरूर तालुक्यातील वेगवेगळ्या शासकीय पदावर कार्यरतअसलेले अधिकारी उपस्थित होते.

Monday, 15 October 2018

सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल, केंदूर


वाचन प्रेरणा दिन दि.15 आँक्टोबर 2018 , माजी राष्ट्रपती , महान शास्त्रज्ञ डाँ.ए.पी.जे.अब्दूल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिना निमित्त विदयालयात सोमवार ,दि.15 आँक्टोबर 2018 रोजी ग्रंथ दिंडी काढण्यात आली. यानिमित्ताने विदयालयात ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले , या प्रदर्शनाचे उदघाटन प.स.सदस्या् शिरुर सौ.सविताताई प-हाड याच्या हस्ते झाले , यावेळी संस्थेचे पुणे विभागीय सदस्य मा.सदाशिवराव थिटे व मा.रामशेठ साकोरे ,केंद्रप्रमुख मा. गणेश गायकवाड ,समाजसेवक मा. श़करराव काटे ,विदयालयाचे प्राचार्य श्री.एम.डी. बेले सर, पर्यवेक्षक श्री.आर.बी.जाधव सर ,ग्रंथपाल श्री.मनोज दोंड ,विदयालयातील शिक्षक-शिक्षकेत्तर सेवक ,ग्रामस्थ , विदयार्थी- विदयार्थीनी उपस्थित होते.
यानंतर विदयार्थ्यांना वर्गात वाचनासाठी ग्रंथ देण्यात आले.












सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल, केंदूर


श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित 'सरदार रघुनाथराव ढवळे   हायस्कूल आणि  ज्युनिअर कॉलेज ,केंदूर मधे कार्याध्यक्ष    प्राचार्य अभयकुमार साळुंखे ,प्राचार्य सुळगेकर सर, पुणे विभाग प्रमुख  प्राचार्य गवळी एस .एम. सर यांची उपस्थिती शुक्रवार दिनांक बारा ऑक्टोबर 2018 रोजी लाभली.या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हेही उपस्थित होते संस्था आणि खासदार फंड या निधीतून शालेय वर्ग खोलींचे भूमिपूजन करण्यात आले. 
संस्था माता आणि बापूजींच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रम सुरू झाला.या कार्यक्रमांमध्ये कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी दलित मित्र बापूजी साळुंखे यांच्या कार्याची माहिती दिली .तसेच संस्थेच्या शैक्षणिक संकुल संबधी माहिती दिली. ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार या संस्थेचा बि्द वाक्यानुसार गुरुदेव कार्यकर्त्यांचे काम चालू आहे.यांची  उपस्थितांना जाणीव करून दिली.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने संस्था विभागीय सदस्य माजी सभापती सदाशिवराव  थिटे , रामशेठ साकोरे  प्राचार्य  बेले एम .डी. सर  तसेच शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष तुकारामशेठ सुकरे, स्कूल कमिटी चेअरमन पांडुरंग दादा ताथवडे ,आंबेगाव पंचायत समिती सदस्य रवींद्रशेठ करंजखेले, माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्रीताई पलांडे ,
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अरुण भाऊ गिरे, उपसरपंच अभिजीतशेठ साकोरे, शिवसेना शाखाध्यक्ष जयदीप शेठ ताठे, शिरूर आंबेगावमधील शिवसेना कार्यकर्ते, तसेच केंदूर आणि परिसरातील आजी माजी पदाधिकारी ग्रामस्थ , प्रशालेतील वेगवेगळ्या विभागातील अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक ,स्कूलचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


                                                                  अभियांत्रिकी विभाग.                                                      ...