इयत्ता:
आठवी उपक्रमाचे नाव : शेत जमीन तयार करणे .
इयत्ता आठवी च्या मुलांनी शेतजमीन तयार करण्यासाठी आवश्यक ते साहित्य घेऊन शेत जमिनी मध्ये गेले. टिकाव, खोरे यांच्या साह्याने त्यांनी सर्वप्रथम जमीन खोदून काढली . खोदून काढलेल्या जमिनीमधील दगड , गवत मुलांनी हाताने उचलून बाजूला टाकले .खोदलेल्या जमिनीवरची मुलांनी खोर्याच्या साह्याने सरी पाडून घेतली .केलेली सर्व कृती मुलांनी वहीमध्ये व्यवस्थितपणे लिहून घेतली.
उपक्रमाचे नाव - मास्क बनविणे.
साहित्य - सुई, दोरा, इलॅस्टिक, कापड, कात्री, मेजर टेप, इ.
कृती - मेजर टेप ने 20 × 20 चे कापड मोजून घ्या. नंतर सुई दोरा घेऊन कापड चारही बाजूने दुमडून शिवून घ्या व समान अंतरावर दोन्ही बाजूने दोन दोन चुण्या मारून घ्या. नंतर आपल्याला व्यवस्थित वाटेल अशा मापाचे इलॅस्टिक कापून दोन्ही बाजूने शिवून घ्यावे. कोरोनापासून आपल्याला संसर्ग होऊ नये म्हणून मास्क वापरणे गरजेचे आहे. त्यामुळे आपण घरच्या घरी मास्क कसे बनवू शकतो. ही मुलांनी प्रत्यक्ष मास्क बनवून शिकवन घेतली.
उपक्रमाचे नाव–शाळेतील टॉयलेट पत्रा फिटिंग
साहित्य–मेजरींग टेप, गुण्या, कात्री ,हांड ग्लोव्हज,पोगर,हातोडी
कृती–प्रथम आम्ही मुलांना माहिती दिली ,खराब झालेले पत्रे काढून नवीन पत्रे फिट्टींग केले त्यासाठी प्रथम लांबी×रुंदी काढली
40 गेजच्या पत्रा घेतला, 7 फुटाचे पत्रे कट्टींग करून व्यवस्थित पत्रे फिटींग केले
अश्याप्रकारे पत्रे फिटिग केले
लोकोपयोगी सेवेचे नाव –शाळेतील संडास बाथरूमचे पत्रे फित्तिंग केले
खर्च–200रुपये इतका झाला
नफा –100रुपये
No comments:
Post a Comment