शाळेचे नाव:- सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल केंदुर
उपक्रमाचे नाव -माळ रिपेअर करणे
इयत्ता - 9 वी
इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांच्या वर्गावर माळ रिपेरिंग करणे या विषयावर लेक्चर झाले. त्यामध्ये सर्वप्रथम विद्यार्थ्यांना माळेचे कनेक्शन समजावून सांगितले. त्याबद्दल विद्यार्थ्यांना संपूर्ण माहिती मिळाल्यावर त्यांना मल्टीमीटर ने आणि कंट्युनिटी टेस्टर ने वायर व बल्ब कसे चेक करायचे ते विद्यार्थ्यांना कळले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी मल्टीमीटर आणि कटयुनिटी टेस्टर च्या सहाय्याने सर्व एलईडी बल्ब चेक केले आणि माळेचा फॉल्ट शोधून काढला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी माळेचे खराब झालेले पार्ट्स बदलून माळ रिपेअर केली किंवा चालू केली.
प्रात्यक्षिकाचे नाव - तिळाची चिक्की बनविणे.
इयत्ता - 9 वी
थोडक्यात माहिती -
गृह आरोग्य विभागा त् तिळ व गुळाची चिक्की अडविण्यात आली. त्यासाठी पांढरे तीळ, गुळ तूप इत्यादी साहित्य वापरण्यात आले. त्यामध्ये तीळ निवडून भाजून घेण्यात आले गुळ कापून घेतला कढईमध्ये थोडे पाणी टाकून त्याबद्दल गुळ टाकला गुळाचा पाक तयार झाल्या त्याबद्दल टाकले व व्यवस्थित मिक्स करून घेतले पोळपाटाला तुप लावून घेतले व त्यावर हे मिश्रण पसरवून घेतले व थंड होण्याअगोदर वड्या पाडून घेतल्या मकरसंक्राती निमित्त तीळची चिक्की बनविण्यात आली.
प्रात्यक्षिकाचे नाव- मेथीचे पिक घेणे व विक्री करणे
इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या एक गुंठे क्षेत्रावर टिकाऊ कुदळे चे साह्याने खोदणी करून त्यामध्ये बीज प्रक्रिया केलेले मेथीचे बी याची टाकणी केली व त्याला पाणी दिले दोन दिवसांनी पुन्हा पाणी दिले व अशा पद्धतीने चार दिवसानंतर पाच दिवसानंतर पुन्हा पाणी दिले अशा पद्धतीने 28 ते 30 दिवसांमध्ये मेथीची काढणी केली व शाळेमध्ये शिक्षक विद्यार्थी व गावांमध्ये त्याची विक्री केली यातून हे प्रात्यक्षिक करण्यासाठी 200 वीस रुपये खर्चाला व त्यातून 260 रुपये मिळाले यातून 40 रुपये नफा झाला हे प्रात्यक्षिक करत असताना विद्यार्थ्यांना खूप आनंद झाला व हे प्रात्यक्षिक पूर्ण झाले
इयत्ता:-10 वी
उपक्रमाचे नाव:- बांधकाम करणे
प्रथम मुलांना माहिती देवून त्यासाठी लागणारे साहित्य थापी, ओकेबा, हॅन्डग्लोज याचा वापर करून आम्ही व मुलांनी व इंच या साइजचे बांधकाम केले यासाठी उभ्या रचनेचा वापर मटेरियल क्रिशन , विट ,पाणी सिमेंट याचा वापर करून एकत्र मिश्रण केले योग्य मापात आम्ही मुलांना माहिती देवून बांधकाम केले.
प्रात्यक्षिकाचे नाव - लोणचे बनविणे
इयत्ता - 9वी
थोडक्यात माहिती - गृह विभागाअंतर्गत प्रात्यक्षिक करत असताना अन्नपदार्थ पुरविने प्रक्रिया अभ्यासताना गाजर, मुळा, आलं, लसूण, मिरची यांचे मिश्र लोणचे बनविण्यात आले. थंडीच्या दिवसांमध्ये आपल्या शरीराला उष्णतेची गरज असते ही उष्णता गाजर व मुळापासून मिळते. त्यामुळे गाजर मुळ्याचे लोणचे बनविण्यात आले. त्यासाठी गाजर, मुळा, मिरची, आलं, लसूण, लाल तिखट, मीठ, हळद, बडीशेप, काळी मिरी, तेल, मोहरीची डाळ या साहित्याचा वापर करण्यात आला यामधून मुलांनी पुरविणे ही प्रक्रिया अभ्यासली.
No comments:
Post a Comment