शाळेचे नाव:- सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल केंदुर
इयत्ता- नववी
विभागाचे नाव- ऊर्जा व पर्यावरण उपक्रमाचे नाव -गोडाऊन वायरिंग करणे
थोडक्यात माहिती-इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांच्या वर्गावर गोडाऊन वायरिंग करणे यावर लेक्चर झाले. यामध्ये सर्वप्रथम विद्यार्थ्यांना गोडाऊन वायरिंग म्हणजे काय? ती कशी करतात हे सांगितले . गोडाऊन वायरिंग करण्यासाठी कोणती साधने वापरतात तसेच त्यांचा वापर कसा करावा हे सांगून विद्यार्थ्यांना गोडाऊन वायरिंग ची मंडल आकृती तयार करण्यास शिकवले . तसेच विद्यार्थ्यांना विविध प्रकार दाखवून त्यांचा वापर कसा करावा हे देखील स्पष्ट केले. त्यानंतर विद्यार्थ्यांकडून वायरिंग करून घेतली .तसेच गोडाऊन वायरिंग ची पद्धत कुठे कुठे वापरतात हेही विद्यार्थ्यांना यातून कळाले. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन झाले.
इयत्ता आठवी
प्रात्यक्षिकाचे नाव. शाळेमधील बेंच दुरुस्ती करणे
प्रथम आम्ही मुलांना माहिती समजावून सांगितली शाळेमधील त्यांची तुटलेली खराब झालेली आम्ही त्या ब्याच बाहेर काढल्या व अभियांत्रिकी विभागामध्ये आय बी टी यामार्फत मुलांना याबद्दल माहिती सांगितली बेंच तुटलेल्या ठिकाणी आम्ही नवीन फळी बसविली व कटिंग केली तुटलेल्या ठिकाणी वेल्डिंग केले. ड्रिल मशिनच्या साह्याने आम्ही नट बोलट हॉल पाडले अशाप्रकारे मुलांना माहिती समजली
उपक्रमाचे नाव - ओल्या नारळाच्या वड्या
इयत्ता - 8 वि
थोडक्यात माहिती - ओल्या नारळाच्या वड्या बनवण्यासाठी नारळ, साखर, तूप, वीलायची, दूध, बदाम, इ. साहित्य वापरण्यात आले. प्रथम ओल्या नारळ किसनीने बारीक किसून घ्या. किंवा मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. कढईमध्ये थोडेसे तूप टाका. त्यामध्ये बारीक केलेले खोबरे टाका व साखर टाका. वारंवार चमच्याने हलवत राहा. नंतर त्यामध्ये थोडे दूध टाका व विलायची पूड टाका. हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर एका ताटाला तूप लावून घ्या व त्यामध्ये हे मिश्रण व्यवस्थित पसरून घ्या. त्यावर बदामाचे काप टाका गरम असतानाच चाकूने वड्या पाडून घ्या.
इयत्ता - नववी प्रात्यक्षिकाची नाव- प्लॅस्टिक पिशवीमध्ये फुल झाडांची लागवड करणे इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेत आयबी टीव्ही बघा मध्ये प्लॅस्टिक पिशवीमध्ये माती व शेणखत मिसळून त्यामध्ये गुलाब जास्वंद मोगरा इत्यादी फुलझाडांची फांदी लागवड करून त्याला वेळच्या वेळी पाणी दिले अशा पद्धतीने दोनशे रोपे विद्यार्थ्यांनी तयार केली विद्यार्थ्यांना हे प्रात्यक्षिक करत असताना खूप आनंद झाला हे साहित्य जमा करण्यासाठी त्यांनी दोन-तीन मुलांचे ग्रुप तयार केले व त्यामध्ये माती शेणखत प्लास्टिक पिशवी कटर चाकू सर्व साहित्याची जमवाजमव केली व प्रथम प्लास्टिकच्या पिशव्या माती व शेणखत या मिश्रणाने भरून घेतल्या व त्यामध्ये जास्वंद गुलाब मोगरा यांच्या फांद्यांची लागवड केली अशा पद्धतीने रोपे तयार करण्याच्या पद्धती विद्यार्थी शिकले आपल्या घरी प्रत्येक विद्यार्थ्यांनी 20 रोपे तयार करण्यास सांगितले
No comments:
Post a Comment