"ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार " शिक्षणमहर्षि प. पू . डॉ.बापूजी साळुंखे .

Thursday, 1 April 2021

JANUARY 2021

 आभियांत्रिकी विभाग  

उपक्रमाचे नाव–प्राथमिक शाळा झेंडा वेल्डिंग करणे 
साहित्य –हॅण्ड ग्लोव्हज ,हातोडी ,वेल्डिंग रॉड , गॉगल,टेप 
 साधने–वेल्डिंग मशीन
कृती प्रथम आम्ही तुटलेला झेंडा पॉलिश पेपर ने घासून व्यवस्थित रित्या आहे त्या ठिकाणी घट्ट पकडुन वेल्डिंगचा टाका मारला
 व मशीनचा करंट वाढवून पूर्ण वेल्डिंग भरून काढले
अशाप्रकारे मुलांना माहिती मिळाली
 लोकोपयोगी सेवेचे नाव –शाळेतील झेंडा वेल्डिंग करणे
खर्च–200रुपये 
नफा –100रुपये





ग़ृह व आरोग्य विभाग  

 उपक्रमाचे नाव - प्रजासत्ताक दिन साजरा करणे. 
थोडक्यात माहिती - 2020-21 मध्ये कोविड चे संकट असतानाही अतिशय काळजी घेऊन सर्वानी मास्क लावून तसेच सोशल डिस्टन्सचा वापर करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यामध्ये नवीन पाहुण्यांचे तसेच ग्रामपंचायत सदस्य यांचे स्वागत करण्यात आले. यासाठी मुलांनी छान प्रतिसाद दिला. थोडक्यात भाषणे उरकवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. 




 - बटाटे वडे बनविणे. 
साहित्य - पाव, बटाटे, बेसनपीठ, तेल, मीठ, मिरची, आलं, लसूण, कोथींबीर, इ. 
कृती - प्रथम बटाटे उकडून व साले काढून व कुस्करून घ्या. त्यामध्ये बारीक वाटलेले आले, लसूण, मीठ, मिरची, हळद मिक्स करावे. त्यावर बारीक चिरलेली कोथींबीर टाकावी व ह्या मिश्रणाचे गोळे करून चपटे करावे. त्यानंतर बेसनपीठात पाणी थोडे  टाकून मिक्स करून घ्या. त्यानंतर गोळे बेसनपीठात बुडऊन गरम तेलातून टाळून घ्या. हइ बटाटे वडे पावा सोबत सर्व्ह करा. यामधून मुलांनी तळणे हि प्रक्रिया अभ्यासली. 






No comments:

Post a Comment

                                                                  अभियांत्रिकी विभाग.                                                      ...