"ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार " शिक्षणमहर्षि प. पू . डॉ.बापूजी साळुंखे .

Thursday, 1 April 2021

DECEMBER 2020

 शेती व पशुपालन विभाग 

उपक्रमाचे नाव :..साहित्य साधनांची ओळख 
थोडक्यात माहिती :इयत्ता नववीच्या मुलांना साहित्य आणि साधनांची ओळख करून दिली.शेतीसाठी साहित्य आणि साधने त्यांचा उपयोग कसा करावा याची इत्थंभूत माहिती मुलांना दिली .उदाहरणार्थ खोरे ,टिकाव , कुदळ ,फावडे ,घमेले इत्यादी साधनांची माहिती मुलांना दिली .ही सर्व माहिती मुलांनी चित्रासहित वहीमध्ये त्याचे उपयोग लिहून घेतले.मुलांना शेती करत असताना या साधनांचा उपयोग माहीत असणे नितांत गरजेचे होते .







आभियांत्रिकी विभाग 

उपक्रमाचे नाव–शाळेतील पाइप लाईन लिकेज् काढणे 
साहित्य –टिकाव , खोरे, कुदळ ,फावडे 
कृती –प्रथम आम्ही मुलांना माहिती देऊन जमिनीत पाइप लाइन लिकेज आहे .
ते लिकेज् कसे काढावे याची माहिती दिली 
टिकाव या साधनाचा वापर करून कसे करणे 
आम्ही तिथे जमीन खोदून खड्डे खोदले व बेंड झालेले पाइप कटिंग केले व 
नवीन सॉकेट फिट्टिग केले आणि लीकेज बंद केले .
लोकोपयोगी सेवेचे नाव– पाइप लाइन लिकेज काढणे 
खर्च–100रुपये 
नफा –50रुपये






ग़ृह व आरोग्य विभाग 

उपक्रमाचे नाव - कवीड -19 ची माहिती. 
थोडक्यात माहिती - मार्च 2020  पासून आपल्या भारतामध्ये कोरोना या रोगाने शिरकाव गेला आहे. हा रोग एका व्यक्तीपासून अनेक व्यक्तींना होतो. त्याच्यापासून आपले संरक्षण करण्यासाठी कोण- कोणती काळजी घ्यावी याचे मार्गदर्शन मुलांना करण्यात आले. 
1)  वारंवार हात साबणाने स्वच्छ धुवावेत. 
2)  गर्दीमध्ये जाणे टाळावे. 
3)  तोंडाला नेहमी मास्क लावावे. 
4)  दोन व्यक्तींमध्ये कमीत कमी 6 फुटाचे अंतर ठेवावे. 
5)  सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी झाल्यास त्वरित डॉक्टरांकडे जावे. 
 अशाप्रकारे मुलांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे मुले स्वतःची काळजी घेऊ शकतील. 





 उपक्रमाचे नाव - साधनांची ओळख. 
थोडक्यात माहिती - गृह  आरोग्य विभाअंतर्गत वापरली जाणारी साहित्य व साधने यांची ओळख व वापर कसा करावा याबद्दल माहिती देण्यात आली. उदा. -
1) ओव्हन - अन्नपदार्थ भाजण्यासाठी. (नानकेट, बिस्किट, ढोकळा, केक)
2) मिक्सर -  अण्णापदार्थ वाटून बारीक करण्यासाठी. (शेंगदाणे, खोबरे, भाजीसाथीचे वाटण)
3) कढई - पदार्थ टाळण्यासाठी. (भजी, बटाटे वडे )
4) किसणी - खोबरे, बटाटे किसण्यासाठी.
अशाप्रकारे वेगवेगळ्या साधनांची माहिती देण्यात आली





उपक्रमाचे नाव - रव्याचे अप्पे. 
साहित्य - रवा, दही, शिमला मिरची, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, मीठ, तेल, अप्पे पात्र, इ. 
कृती -  प्रथम शीमला मिरची, कांदा, टोमॅटो बारीक चिरून घ्यावेत. एका बाऊलमध्ये रवा, चिरलेली मिरची, टोमॅटो, कांदा, दही, मीठ एकत्र मिक्स करून घ्यावे. हवे असल्यास थोडे पाणी टाकावे व एक दोन तास झाकून ठेवावे नंतर आप्पे पात्राला तेल लावून घ्यावे व त्यामध्ये चमच्याने थोडे थोडे मिश्रण टाकावे व झाकण ठेवावे 2 मिनिटांनी झाकण काढून आप्पे पलटी करावे व एका भांड्यामध्ये काढून घ्यावे आप्पे टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करावे. यामधून मुलांनी वाफविणे ही प्रक्रिया अभ्यासली. 



No comments:

Post a Comment

                                                                  अभियांत्रिकी विभाग.                                                      ...