शेती व पशुपालन विभाग
इयत्ता आठवी
उपक्रमाचे नाव :मेथीच्या जुडीची विक्री करणे .
थोडक्यात माहिती :इयत्ता आठवी च्या मुलांनी मेथीचा जुडीची विक्री करण्यासाठी सर्वप्रथम रानातील मेथी उपटली सुतळीच्या साह्याने ती मेथी बांधून घेतली .एकूण अकरा मेथीची जुडी निघाली .पाच रुपये याप्रमाणे विक्री केली .55 रुपये इतके मेथीच्या जुड्यांचे पैसे झाले .या मेथीच्या जुड्यांची विक्री शाळेतील शिक्षकांना केली .खर्च वजा जाता वीस रुपये इतका नफा झाला .या उपक्रमाच्या साह्याने मुलांना प्रत्यक्ष माल शेतीमधून विक्रीसाठी बाजारामध्ये कसा नेतात आणि विक्री केल्यानंतर त्याचा हिशोब मुलांना ठेवता आला .या उपक्रमाचे सर्व इत्थंभूत माहिती मुलांनी व्यवस्थितरित्या वहीमध्ये लिहून घेतली .
अभियांत्रिकी विभाग
इयत्ता—आठवी
उपक्रमाचे नाव–शाळेतील टॉयलेट पत्रा फिटिंग
साहित्य–मेजरींग टेप, गुण्या, कात्री ,हांड ग्लोव्हज,पोगर,हातोडी
कृती–प्रथम आम्ही मुलांना माहिती दिली ,खराब झालेले पत्रे काढून नवीन पत्रे फिट्टींग केले त्यासाठी प्रथम लांबी×रुंदी काढली
40 गेजच्या पत्रा घेतला, 7 फुटाचे पत्रे कट्टींग करून व्यवस्थित पत्रे फिटींग केले
अश्याप्रकारे पत्रे फिटिग केले
लोकोपयोगी सेवेचे नाव –शाळेतील संडास बाथरूमचे पत्रे फित्तिंग केले
खर्च–200रुपये इतका झाला
नफा –100रुपये
ग़ृह व आरोग्य विभाग
उपक्रमाचे नाव - मिठीचे पराठे बनविणे.
साहित्य - गव्हाचे पीठ, मेथीची भजी, हिरवी मिरची, मीठ, तेल, लसूण, इ.
कृती - प्रथम मेथी बारीक चिरून घ्या. त्यामध्ये मीठ, मिरची, लसुन बारीक करून मिक्स करून घ्या. नंतर हे सर्व गव्हाच्या पिठामध्ये व्यवस्थित मळून घ्या व त्याचे छोटे छोटे गोळे तयार करुन पोळपाट लाटन्याने लाटून द्या. गॅसवर तवा ठेवून पराठे भाजून घ्या व त्याला वरून खालून तेल लावा. यामधून मुलांनी अन्नपदार्थ बनविण्याच्या प्रक्रियेमध्ये भाजणे ही प्रक्रिया अभ्यासली.
No comments:
Post a Comment