"ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार " शिक्षणमहर्षि प. पू . डॉ.बापूजी साळुंखे .

Thursday, 1 April 2021

OCTOBER 2020

शेती   विभाग


 बीजप्रक्रिया करणे 

इयत्ता आठवी 
थोडक्यात माहिती :इयत्ता आठवी च्या मुलांनी बीजप्रक्रिया कशी करणे हे प्रात्यक्षिक स्वतः केले बीज प्रक्रिया केल्यामुळे बीजप्रक्रिया होणारे फायदे आणि बीजप्रक्रिया केल्यामुळे उत्पादनामध्ये होणारी वाढ या संदर्भात मुलांनी माहिती घेतली .बीजप्रक्रिया करण्यासाठी मुलांनी मेथीचे बी गुळ पाणी आणि रायझोबियम याचा उपयोग केला .बीजप्रक्रिया केलेले मेथीचे बिग मुले शेतामध्ये टाकणार आहेत आणि त्याचे निरीक्षण करून बीजप्रक्रिया चे होणारे फायदे नमूद करणार आहेत







ग़ृह व आरोग्य   विभाग


उपक्रमाचे नाव - कांदा भजी करणे. 
साहित्य - बेसनपीठ, लाल तिखट, मीठ, तेल, ओवा, खायचा सोडा, हळद, कोथिंबीर, इ. 
कृती -  प्रथम  कांदे कापून घ्यावेत. नंतर एका बाउल मध्ये कापलेले कांदे, बेसन पीठ, मीठ, हळद, लाल तिखट, ओवा इत्यादी साहित्य टाकून थोडे थोडे पाणी टाकून पीठ भिजवून घ्यावेत. हे मिश्रण जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नसावे. वरून थोडा खायचा सोडा टाकावा व बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी नंतर गॅसवर कढई ठेवून तेल गरम झाल्यावर छोटी छोटी भजी तळून घ्यावी. यामधून मुलांनी तळणे ही प्रक्रिया अभ्यासली. 





अभियांत्रिकि विभाग 

उपक्रमाचे नाव –शाळेतील पाण्याच्या टाकीचे नळ फिट्टिग
साहित्य –पाइप ,पान्हा मेजोरींग टेप 
कृती–पाण्याच्या टाकीचे तुटलेले नळ काढून आम्ही ते नवीन फिट्टिग केले 
मुलांना समजावून पाइप पान्हा याच्या द्वारे खराब नळ काढून नवीन सॉकेट फिट्टिग केले 
लाईन होती आणि मुलांच्या लक्षात आले नळ फिट्टिग कसे करायचे यामध्ये मुलांचे कौशल्य आले 
अशाप्रकारे नळ फिट्टिग करून लिकेज् बंद केले 
लोकोपयोगी सेवेचे नाव –पाण्याच्या टाकीचे नळ फिट्टिग 
खर्च –400रुपये 
नफा –100रुपये








No comments:

Post a Comment

                                                                  अभियांत्रिकी विभाग.                                                      ...