आभियांत्रिकी विभाग
उपक्रमाचे नाव-बिजागिरी वेल्डिंग करणे
साहित्य-मेजरींग टेप, मार्कर, अॅप्रॉन, वेल्डिंग गॉगल, वेल्डिंग मशिन.
कृती-प्रथम मुलांना माहिती देऊन दरवाजाची बिजागिरी तुटलेली होती ती ग्राईडिंग मशिन घ्या साहाय्याने काढून घेतली व ४इंचा ची नवीन वेल्डिंग केली अशा प्रकारे तुटलेले पार्ट कसे काढणे,कसे वेल्डिंग करावे मुलांच्या लक्षात आले व आनंद झाला, माहिती मिळाली.
लोकोपयोगी सेवेचे नाव-बिजागिरी वेल्डिंग करणे .
खर्च-३००₹
नफा-१५०₹
उपक्रमाचे नाव - बटाटे वडे बनविणे.
साहित्य - पाव, बटाटे, बेसनपीठ, तेल, मीठ, मिरची, आलं, लसूण, कोथींबीर, इ.
कृती - प्रथम बटाटे उकडून व साले काढून व कुस्करून घ्या. त्यामध्ये बारीक वाटलेले आले, लसूण, मीठ, मिरची, हळद मिक्स करावे. त्यावर बारीक चिरलेली कोथींबीर टाकावी व ह्या मिश्रणाचे गोळे करून चपटे करावे. त्यानंतर बेसनपीठात पाणी थोडे टाकून मिक्स करून घ्या. त्यानंतर गोळे बेसनपीठात बुडऊन गरम तेलातून टाळून घ्या. हइ बटाटे वडे पावा सोबत सर्व्ह करा. यामधून मुलांनी तळणे हि प्रक्रिया अभ्यासली.
उपक्रमाचे नाव - बेसन पिठाचे लाडू बनविणे.
साहित्य - बेसनपीठ, साखर, तेल, विलायची, ड्रायफ्रूट, इ.
कृती - प्रथम बेसनपीठ पाण्यामध्ये मळून घ्यावे. व त्याच्या पुऱ्या करून घ्या. पुऱ्यांचा बारीक भुगा करून घ्या. पातेल्यामध्ये साखरेचा पाक तयार घ्या. पाक तयार झाल्यावर त्यामध्ये पुऱ्यांचा भुगा टाकावा. ही मिश्रण थंड झाल्यावर त्याचे माध्यम आकाराचे लाडू बनवून घ्या. अशाप्रकारे मुलांनी पाक कसा बनवायचा ही अभ्यासले.
No comments:
Post a Comment