केक बनविणे:
थोडक्यात माहिती -
अन्नपदार्थ बनविण्याच्या प्रक्रियेमध्ये पदार्थ भाजणे ही प्रक्रिया अभ्यासत असताना
केक बनविण्यात आला. त्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे पारलेजी बिस्किट पॅकेट,
दूध, बेकिंग पावडर, व्हेनीला इसेंन्स,
इत्यादी.
कृती - प्रथम बिस्किटाचे तुकडे करून ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतले. नंतर त्यामध्ये पिठी साखर, बेकिंग पावडर, व्हॅनिला इसेन्स व दूध टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतले एका गोल डब्यात आतून तेल लावून त्यामध्ये हे मिश्रण ओता व ओव्हनमध्ये १८०°c तापमानाला ठेवा. केक तयार झाल्यानंतर तो बाहेर काढा. यामधून मुलांनी भाजणे ही प्रक्रिया अभ्यासली. ओहन नसेल तर कुकर मध्ये केक बनवू शकतो.
इयत्ता
-नववी
उपक्रमाचे
नाव- वायर गेज मोजणे
विभागाचे
नाव- ऊर्जा व पर्यावरण
इयत्ता नववीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे वायर गेज या विषयावर ऑनलाईन प्रशिक्षण झाले. यामध्ये विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या तारा ,वायर ,केबल दाखविण्यात आल्या. प्रत्येक तारांची केबल ची ओळख करून दिली. विद्यार्थ्यांना वायर गेज म्हणजे काय? ते कसे मोजतात? मोजण्यासाठी कोणते टूल वापरतात हे सर्व सांगितले. त्यातून टूल बद्दल संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना कळाली व त्याचा वापर कसा करावा हे देखील कळाले. कंडक्टर वायर मधून आणि केबल मधून तार व्यवस्थित काढणे तसेच वायर गेज हाताळणे हे सर्व विद्यार्थ्यांना समजले. विद्यार्थ्यांना वायर गेज स्टॅंडर्ड टूल ने मोजून दाखविले. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन होऊन सेशन संपले
.
No comments:
Post a Comment