शाळेचे नाव- सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल केंदुर
प्रात्यक्षिकाचे नाव - मंचुरीयन बनवणे.
इयत्ता - ८ वी
थोडक्यात
माहिती - अन्नपदार्थ बनविण्याच्या प्रक्रियेमध्ये मंचूरियन बनविण्यात आले त्यासाठी लागणारे साहित्य कोबी, शिमला मिरची, हिरवी मिरची, मीठ, तेल, मैदा, कॉर्न फ्लावर, गाजर, मंचुरियन मसाला, बेकिंग पावडर, कांद्याची पात, इ.
कृती - प्रथम कोबी, गाजर, शिमला मिरची, बारीक चिरून घ्या. त्यामध्ये मैदा, कॉर्नफ्लोअर, मीठ, बेकिंग पावडर टाकून थोडे थोडे पाणी टाकून पीठ मळून घ्या. त्याचे छोटे छोटे गोळे बनवून तळून घ्याा. कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये कांदा टाकून त्यावर मंचूरियन मसाल्याचे मिश्रण टाका व त्यावर कांदा पात कापून टाका. चटपटीत मंचुरियन तयार होईल.
ऊर्जा पर्यावरण
इयत्ता-
दहावी
विभागाचे
नाव ऊर्जा पर्यावरण
उपक्रमाचे नाव- विद्युत तंत्रज्ञानाची ओळख व प्रात्यक्षिके
इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या वर्गावर विद्युत तंत्रज्ञानाची ओळख व प्रात्यक्षिके या विषयाचे ऑनलाइन सेशन झाले .त्यामध्ये विद्यार्थ्यांना विजेचे महत्त्व समजावून सांगितले. विद्युत तंत्रज्ञानातील मूलभूत संकल्पना समजावून सांगितल्या. यातून विद्यार्थी ट्रांजिस्टर चे कार्य महत्व उपयोग शिकले .तसेच कॅपॅसिटर चे ही कार्य व संकल्पना मुलांना समजल्या ,यातून विद्यार्थी ओहमचा नियम ही शिकले. विद्यार्थ्यांना करंट चे प्रकार त्याचे कार्य समजावून सांगून एकसर जोडणी समांतर जोडणी कशी करावी तसेच त्यातील फरकही सांगितला. यामध्ये विद्यार्थ्यांना विविध तंत्रज्ञान यांची ओळख झाली व त्यांस कडून लहान-मोठे प्रात्यक्षिके देखील करून घेतली. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या सर्व शंकांचे निरसन करून ऑनलाईन सेशन संपले.
प्रात्यक्षिकाचे
नाव- साहित्य साधनांची ओळख, उपयोग
शाळेचे
नाव-सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल,केंदूर
इयत्ता-आठवी
उपक्रमाचे
नाव-शेडचे पोल उभे करणे.
साहित्य-
मेजरींग टेप,ओळंबा,लेवल टूब,मार्कर,लाईन दोरी.
कृती-प्रथम आम्ही मुलांना माहिती दिली. नंतर आम्ही शेंडी लांबी, रुंदी काढली. ३×१.१/२ अशी C चॅनल
ची साइज घेऊन १० फुटाचे २
नग कटिंग केले.योग्य मापात खड्डे घेऊन पोल उभे केले.लेवलटूब ने दोन्ही पोलची
लेवल काढली.अशा प्रकारे मुलांना माहिती देऊन पोल उभे केले.
लोकोपयोगी
सेवेचे नाव-पोल उभे करणे.
खर्च-५०₹
नफा-१५०₹
No comments:
Post a Comment