इयत्ता-
नववी
उपक्रमाचे नाव- सिरीज माळ बनविणे
थोडक्यात माहिती-इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांच्या वर्गावर सिरीज माळ बनविणे या विषयावर लेक्चर झाले. यामध्ये सर्वप्रथम विद्यार्थ्यांना सिरीज कनेक्शन बद्दल संपूर्ण माहिती दिली, ते कसे करतात हे सांगितले. त्यानंतर विद्यार्थ्यांना सिरीज कनेक्शन करून लाईटिंग माळ कशी बनवायची हे सांगितले, विद्यार्थ्यांना कनेक्शन करून दाखविले. सिरीज माळ बनवताना कॅप, होल्डर, वायर ,एलईडी बल्ब, पावर किट, याचा वापर कसा करतात हेही विद्यार्थ्यांना समजले. सिरीज माळ बनवण्यासाठी एका माळी साठी सुमारे 175 रुपये इतका खर्च आला. विद्यार्थ्यांना सिरीज कनेक्शन बद्दल सर्व कन्सेप्ट क्लियर झाल्याने त्यांनी खूप छान सिरीज माळ बनविली,आणि लेक्चर संपले.
प्रात्यक्षिकाचे
नाव - समोसे बनविणे.
थोडक्यात
माहिती - अण्णा पदार्थ बनविण्याच्या प्रक्रियेमध्ये तळणे ही प्रक्रिया अभ्यासताना
समोसे बनविण्यात आले. त्यासाठी बटाटे, वाटाणा, मैदा, आले, लसूण, गरम मसाला, हिरवी मिरची, मीठ, तेल, ओवा, कोथिंबीर, हळद, इत्यादी साहित्य वापरण्यात आले
शाळेचे नाव सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल केंदुर
उपक्रमाचे नाव : बेंच दुरुस्ती करणे.
इयत्ता :आठवी
साहित्य :- मेजरींग, हथोडी, वेल्डिंग गॉगल, मार्कर, स्क्रू हॅन्ड ग्लोज
थोडक्यात माहिती :कोणत्या प्रकारची स्कूल शाळेतील मुलांना माहिती देऊन कोण कोणत्या प्रकारचे स्क्रू कसे फिटिंग दीलींग करून घ्यायचे माहिती दिली तुटलेला बॅन दुरुस्ती वेल्डिंग केले व मुलांनी सहा एम एम चे ड्रिलिंग फळी वरती करून फिटिंग केले .तुटलेले पाय वेल्डिंग केले 3:15 या साइज वापरला व योग्य मापात फळी कटिंग केले व्यवस्थित रित्या बेंच रिपेरिंग केल्या.अशाप्रकारे बेंजो दुरुस्ती केली. लोकोपयोगी सेवेचे नाव शाळेतील बेंच दुरुस्ती करणे खर्च 100 रुपये नफा 50 रुपये झाला .
इयत्ता दहावी.
उपक्रमा काचे नाव. भिंतीवरती खड्डे करणे.
साहित्य. मेजरींग टेप. छणी.हातोडी लाईन दोरी. इत्यादी
थोडक्यात माहिती.प्रथम मुलांना माहिती देऊन भिंतीवरती कॉल पाडण्यासाठी लागणारे साहित्य त्यांनी हातोडी पोगर ही हत्यारे वापरली प्रथम आम्ही दहा फुटाच्या अंतरावर ती भिंतीवर होल पाडले असे पाच खड्डे सहा इंचाचे तयार केले त्यामुळे भिंतीवरती उभे करण्यासाठी यावरती लोखंडी खांब उभे करून त्यावर ती कापड बांधायचे होते कारण इकडचा पक्षी पलीकडे जाऊ नये म्हणून आम्ही ते खड्डे तयार करून दिले. यामधून मुलांचे कौशल्य आणि त्यांची सहानुभूतीपूर्वक त्यांनी काळजी घेतली या हत्याराचा.व आय बी टी चा उपक्रम चांगला मुलांच्या लक्षात येतोयामध्ये मुलांना स्वतः काम करण्यास आनंद होतोलोकोपयोगी सेवेचे नाव. भिंतीवरती खड्डे तयार करण्यासाठी
खर्च.50.
नफा.100
प्रात्यक्षिकाचे नाव _ बीज प्रक्रिया करणे विद्यार्थ्यांना आपल्या घरच्या शेतात व शाळेचे प्लॉटवर कोणतही पिक घेण्याचे म्हटलं तरी या बियाणांवर वेळोवेळी रासायनिक व जैविक पद्धतीने बीजप्रक्रिया करावी लागते बीज प्रक्रिया करत असताना बुरशीनाशक औषध व पावडर गुळा चे पाणी समप्रमाणात वापरावे बीज प्रक्रिया फायदे व तोटे विद्यार्थ्यांना स्पष्ट करता येतात उत्पादनामध्ये होणारी वाढ मरण्याचे प्रमाण कमी होते सर्व बाबींचा विचार करून बीज प्रक्रिया चे अशा पद्धतीने बीज प्रक्रिया फायदे विद्यार्थी स्पष्ट करतात अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी बीज प्रक्रिया हे प्रात्यक्षिक आपल्या शाळेमध्ये केले व सर्वांनी त्यामध्ये सहभाग घेतला व आनंद व्यक्त केला
No comments:
Post a Comment