शाळेचे नाव- सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल केंदुर
ऊर्जा व पर्यावरण
इयत्ता-
नववी
विभागाचे नाव- ऊर्जा व पर्यावरण
उपक्रमाचे नाव- बोर्ड वायरिंग करणे
थोडक्यात
माहिती-इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांच्या वर्गावर बोर्ड वायरिंग करणे या विषयावर लेक्चर
झाले. यामध्ये सर्व प्रथम विद्यार्थ्यांना बोर्ड वायरिंग म्हणजे काय? ती कशी
करायची याबद्दल माहिती सांगितली. बोर्ड वायरिंग करताना सांकेतिक चिन्हांचा कसा वापर होतो ,तो कसा करावा,
याबद्दल माहिती विद्यार्थ्यांना मिळाली. विद्यार्थ्यांना बोर्डवायरिंग ची कृती सांगून
त्यांच्याकडून वायरिंग करून घेतली. त्यानंतर विद्यार्थी मंडला कृती तयार करायला शिकले. यामध्ये विद्यार्थ्यांना बोर्ड वायरिंग बद्दल संपूर्ण ज्ञान मिळाले . यामध्ये विद्यार्थ्यांना एकूण खर्च 150 रुपये आला.त्यानंतर विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन झाले.
इयत्ता- दहावी
विभागाचे नाव -ऊर्जा व पर्यावरण
उपक्रमाचे नाव-पर्जन्य व पर्जन्यमापक
थोडक्यात माहिती-इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या वर्गावर पर्जन्य व पर्जन्यमापक या
विषयावर सेशन झाले. यामध्ये विद्यार्थ्यांना पाऊस (पर्जन्य )कसा पडतो? हे सांगून पर्जन्यमापक
म्हणजे काय? पर्जन्यमापकाचा उपयोग ,पर्जन्य मोजण्याचे एकक, हे सर्व सांगितले.
पर्जन्यमापक बनविण्याची पद्धत तसेच त्यासाठी लागणारे साहित्य सांगून विद्यार्थ्यांना पर्जन्यमापक बनविण्याची कृती देखील सांगितली. त्यानंतर विद्यार्थ्यांना काढून सर्व साहित्यांचा वापर करून पर्जन्यमापक बनवून घेतले. पर्जन्यमापक च्या सहाय्याने विद्यार्थी पर्जन्याची नोंदणी करण्यास शिकले. तसेच यातून विद्यार्थी मिळालेल्या माहितीतून माहितीचे वर्गीकरण करण्यासही शिकले . त्यानंतर विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन झाले.
इयत्ता- दहावी
उपक्रमाचे
नाव-आयबी बोर्ड साठी स्टॅन्ड तयार करणे.
साहित्य-
मेजरींग टेप ,राईट अँगल, मार्कर , रॉंड,
साधन
-कटिंग मशीन ,वेल्डिंग मशीन ,ड्रिल मशीन इत्यादी.


प्रात्यक्षिकाचे नाव - ओल्या नारळच्या वड्या
इयत्ता- दहावी
थोडक्यात
माहिती - अन्न पदार्थ बनविण्याच्या प्रक्रियेमध्ये पाकाचे प्रकार अभ्यासताना ओल्या नारळाच्या वड्या बनविण्यात आल्या. त्यासाठी नारळ, साखर, विलायची, तूप, बदाम, इ. साहित्य वापरण्यात
आले.
कृती
- प्रथम खोबरे किसून घेतले. त्यानंतर मेजर कपने साखर व खोबरे मोजून
घेतले व गॅसवर कढईमध्ये
साखर व खोबरे व्यवस्थित
मिक्स होईपर्यंत व सुके होईपर्यंत
चमच्याने हलवत राहावेे. त्यामध्ये विलायची पावडर टाकावी व नंतर एका
ताटाला तूप लावून घ्यावे. त्यामध्ये हे मिश्रण ओतावे
व व्यवस्थित पसरून घ्यावे. त्याच्यावरून बदामाचे काप टाकावे थंड होण्याअगोदर वड्या पाडून घ्याव्यात. अशा प्रकारे साखरेऐवजी गूळ वापरून सुद्धा वड्या करता येतात.
प्रात्यक्षिकाचे
नाव _ शाळेसाठी गार्डन तयार करणे व ठिबक जोडणी
करणे आपल्या शाळेतील गार्डन तयार करून त्यावर माती टाकून शोची झाडे लागवड करणे व त्याला ठिबक
जोडणी करून पाणी देणे हे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी
केले शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी विटा लावून घेतल्या त्यामध्ये माती टाकली शोची झाडे लागवड करून ठिबक पद्धतीने पाणी सोडण्यात आले व अशा पद्धतीने
विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये गार्डन साठी झाडे तयार करून माती टाकून ठिबक सिंचन करून जोडणी केली अशा पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला प्रात्यक्षिक करताना विद्यार्थ्यांना खूप आवड निर्माण झाली
No comments:
Post a Comment