"ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार " शिक्षणमहर्षि प. पू . डॉ.बापूजी साळुंखे .

Thursday, 1 April 2021

MARCH 2021

 आभियांत्रिकी विभाग 


उपक्रमाचे नाव-बिजागिरी वेल्डिंग करणे
साहित्य-मेजरींग टेप, मार्कर, अॅप्रॉन, वेल्डिंग गॉगल, वेल्डिंग मशिन.
कृती-प्र‌थम मुलांना माहिती देऊन दरवाजाची बिजागिरी तुटलेली होती ती ग्राईडिंग मशिन घ्या साहाय्याने काढून घेतली व ४इंचा ची नवीन वेल्डिंग केली अशा प्रकारे तुटलेले पार्ट कसे काढणे,कसे वेल्डिंग करावे मुलांच्या लक्षात आले व आनंद झाला, माहिती मिळाली.
लोकोपयोगी सेवेचे नाव-बिजागिरी वेल्डिंग करणे ‌.
खर्च-३००₹
नफा-१५०₹






ग़ृह व  आरोग्य विभाग 

उपक्रमाचे नाव - बटाटे वडे बनविणे. 
साहित्य - पाव, बटाटे, बेसनपीठ, तेल, मीठ, मिरची, आलं, लसूण, कोथींबीर, इ. 
कृती - प्रथम बटाटे उकडून व साले काढून व कुस्करून घ्या. त्यामध्ये बारीक वाटलेले आले, लसूण, मीठ, मिरची, हळद मिक्स करावे. त्यावर बारीक चिरलेली कोथींबीर टाकावी व ह्या मिश्रणाचे गोळे करून चपटे करावे. त्यानंतर बेसनपीठात पाणी थोडे  टाकून मिक्स करून घ्या. त्यानंतर गोळे बेसनपीठात बुडऊन गरम तेलातून टाळून घ्या. हइ बटाटे वडे पावा सोबत सर्व्ह करा. यामधून मुलांनी तळणे हि प्रक्रिया अभ्यासली. 





 




 उपक्रमाचे नाव - बेसन पिठाचे लाडू बनविणे. 
साहित्य - बेसनपीठ, साखर, तेल, विलायची, ड्रायफ्रूट, इ. 
कृती -  प्रथम बेसनपीठ पाण्यामध्ये मळून घ्यावे. व त्याच्या पुऱ्या करून घ्या. पुऱ्यांचा बारीक  भुगा करून घ्या. पातेल्यामध्ये साखरेचा पाक तयार घ्या. पाक तयार झाल्यावर त्यामध्ये पुऱ्यांचा भुगा टाकावा. ही मिश्रण थंड झाल्यावर त्याचे माध्यम आकाराचे लाडू  बनवून घ्या. अशाप्रकारे मुलांनी पाक कसा बनवायचा ही अभ्यासले.  

FEBRUARY 2021

 आभियांत्रिकी  विभाग 

उपक्रमाचे नाव–चप्पल स्टँड तयार करणे 
साहित्य – मेजरिंग टेप ,मार्कर, हॅण्ड ग्लोव्हज , वेल्डिंग रॉड, गॉगल
साधने–वेल्डिंग मशीन,कटिंग मशीन
कृती –प्रथम मुलांना माहिती देऊन 8मम चे बार घेतले ते आम्ही मशीन द्वारे कट्टिंग केले नंतर आम्ही ते ग्रिंडींग केले बेंड झालेले बार हतोडीचा वापर करून सरळ करून व्यवस्थित केले 
नंतर आम्ही प्रथम 1 फुटाचे 12 नग कटिंग केले ते कटिंग केलेले बारचे पहिला चौकोन केले व पाय जोडले आणि नंतर पेंटींग केले 
अश्या प्रकारे काम पूर्ण केले 
लोकोपयोगी सेवेचे नाव –चप्पल स्टँड तयार करणे 
खर्च–400रुपये 
नफा –150रुपये







उपक्रमाचे नाव-गाईचे दुध काढण्यासाठी स्टुल तयार करणे
साहित्य-मेजरींग टेप, मार्कर, हातोडी, वेल्डिंग गॉगल 
कृती-प्रथम आम्ही मुलांना माहिती देऊन मेजरींग टेप ने लांबी रुंदी स्टूलची घेतली २५×३चे अॅगल घेतले मुलांनी ते१फुटांचे ४नग कटींग केले प्रथम फ्रेम बनविली गुण्याच्या साह्याने पाय वेल्डिंग केले अशा प्रकारे स्टुल बनविला.
लोकोपयोगी सेवेचे नाव-गाईचे दुध काढण्यासाठी स्टुल चा उपयोग झाला.
खर्च-१००₹
नफा-५०₹






ग़ृह व आरोग्य  विभाग 

उपक्रमाचे नाव -   गृह आरोग्य विभागात घ्यावयाच्या दक्षता.
थोडक्यात माहिती - गृह  आरोग्य विभागात कृती करत असताना पुढील दक्षता घ्याव्या - 
1) अन्न पदार्थ तयार करत असताना अप्रोन व कॅप घालावी. 
2) हात स्वछ धुऊन घ्यावेत. 
3) वापरात येणारे साहित्य धुऊन घयावे. 
4) गरम भांडी पकडताना पक्कड वापरावी. 
5) वेगवेगळ्या पदार्थाला वेगवेगळा चमचा वापरावा. 
6) गृह आरोग्य विभाग सोडताना फॅन व गॅस चे स्विच बंद करावे. 
अशा प्रकारे काळजी घ्यावी. 




उपक्रमाचे नाव - साबुदाणा खिचडी बनविणे. 
साहित्य - साबुदाणे, शेंगदाणे, बटाटे, मिरची, मीठ, तेल, इ. 
कृती - प्रथम साबुदाणे भिजवून व बटाटे उकडून घ्यावेत.  तसेच शेंगदाणे भाजून त्याचा बारीक कूट करून घ्यावा. गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकावे. तेल गरम झाल्यानंतर कापलेली हिरवी मिरची टाकावी व नंतर शाबुदाणे टाकून चमच्याने हलवून घ्यावे नंतर बटाटा बारीक  कुस्करून टाकावा  व शेंगदाण्याचा कूट टाकावा चवीनुसार मीठ टाकावे व व्यवस्थित खिचडी गरम करून घ्यावी. यामधून मुलांनी अन्नपदार्थ बनविण्याच्या प्रक्रियेमध्ये वाफविणे ही प्रक्रिया अभ्यासली. 










JANUARY 2021

 आभियांत्रिकी विभाग  

उपक्रमाचे नाव–प्राथमिक शाळा झेंडा वेल्डिंग करणे 
साहित्य –हॅण्ड ग्लोव्हज ,हातोडी ,वेल्डिंग रॉड , गॉगल,टेप 
 साधने–वेल्डिंग मशीन
कृती प्रथम आम्ही तुटलेला झेंडा पॉलिश पेपर ने घासून व्यवस्थित रित्या आहे त्या ठिकाणी घट्ट पकडुन वेल्डिंगचा टाका मारला
 व मशीनचा करंट वाढवून पूर्ण वेल्डिंग भरून काढले
अशाप्रकारे मुलांना माहिती मिळाली
 लोकोपयोगी सेवेचे नाव –शाळेतील झेंडा वेल्डिंग करणे
खर्च–200रुपये 
नफा –100रुपये





ग़ृह व आरोग्य विभाग  

 उपक्रमाचे नाव - प्रजासत्ताक दिन साजरा करणे. 
थोडक्यात माहिती - 2020-21 मध्ये कोविड चे संकट असतानाही अतिशय काळजी घेऊन सर्वानी मास्क लावून तसेच सोशल डिस्टन्सचा वापर करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यामध्ये नवीन पाहुण्यांचे तसेच ग्रामपंचायत सदस्य यांचे स्वागत करण्यात आले. यासाठी मुलांनी छान प्रतिसाद दिला. थोडक्यात भाषणे उरकवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. 




 - बटाटे वडे बनविणे. 
साहित्य - पाव, बटाटे, बेसनपीठ, तेल, मीठ, मिरची, आलं, लसूण, कोथींबीर, इ. 
कृती - प्रथम बटाटे उकडून व साले काढून व कुस्करून घ्या. त्यामध्ये बारीक वाटलेले आले, लसूण, मीठ, मिरची, हळद मिक्स करावे. त्यावर बारीक चिरलेली कोथींबीर टाकावी व ह्या मिश्रणाचे गोळे करून चपटे करावे. त्यानंतर बेसनपीठात पाणी थोडे  टाकून मिक्स करून घ्या. त्यानंतर गोळे बेसनपीठात बुडऊन गरम तेलातून टाळून घ्या. हइ बटाटे वडे पावा सोबत सर्व्ह करा. यामधून मुलांनी तळणे हि प्रक्रिया अभ्यासली. 






DECEMBER 2020

 शेती व पशुपालन विभाग 

उपक्रमाचे नाव :..साहित्य साधनांची ओळख 
थोडक्यात माहिती :इयत्ता नववीच्या मुलांना साहित्य आणि साधनांची ओळख करून दिली.शेतीसाठी साहित्य आणि साधने त्यांचा उपयोग कसा करावा याची इत्थंभूत माहिती मुलांना दिली .उदाहरणार्थ खोरे ,टिकाव , कुदळ ,फावडे ,घमेले इत्यादी साधनांची माहिती मुलांना दिली .ही सर्व माहिती मुलांनी चित्रासहित वहीमध्ये त्याचे उपयोग लिहून घेतले.मुलांना शेती करत असताना या साधनांचा उपयोग माहीत असणे नितांत गरजेचे होते .







आभियांत्रिकी विभाग 

उपक्रमाचे नाव–शाळेतील पाइप लाईन लिकेज् काढणे 
साहित्य –टिकाव , खोरे, कुदळ ,फावडे 
कृती –प्रथम आम्ही मुलांना माहिती देऊन जमिनीत पाइप लाइन लिकेज आहे .
ते लिकेज् कसे काढावे याची माहिती दिली 
टिकाव या साधनाचा वापर करून कसे करणे 
आम्ही तिथे जमीन खोदून खड्डे खोदले व बेंड झालेले पाइप कटिंग केले व 
नवीन सॉकेट फिट्टिग केले आणि लीकेज बंद केले .
लोकोपयोगी सेवेचे नाव– पाइप लाइन लिकेज काढणे 
खर्च–100रुपये 
नफा –50रुपये






ग़ृह व आरोग्य विभाग 

उपक्रमाचे नाव - कवीड -19 ची माहिती. 
थोडक्यात माहिती - मार्च 2020  पासून आपल्या भारतामध्ये कोरोना या रोगाने शिरकाव गेला आहे. हा रोग एका व्यक्तीपासून अनेक व्यक्तींना होतो. त्याच्यापासून आपले संरक्षण करण्यासाठी कोण- कोणती काळजी घ्यावी याचे मार्गदर्शन मुलांना करण्यात आले. 
1)  वारंवार हात साबणाने स्वच्छ धुवावेत. 
2)  गर्दीमध्ये जाणे टाळावे. 
3)  तोंडाला नेहमी मास्क लावावे. 
4)  दोन व्यक्तींमध्ये कमीत कमी 6 फुटाचे अंतर ठेवावे. 
5)  सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी झाल्यास त्वरित डॉक्टरांकडे जावे. 
 अशाप्रकारे मुलांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे मुले स्वतःची काळजी घेऊ शकतील. 





 उपक्रमाचे नाव - साधनांची ओळख. 
थोडक्यात माहिती - गृह  आरोग्य विभाअंतर्गत वापरली जाणारी साहित्य व साधने यांची ओळख व वापर कसा करावा याबद्दल माहिती देण्यात आली. उदा. -
1) ओव्हन - अन्नपदार्थ भाजण्यासाठी. (नानकेट, बिस्किट, ढोकळा, केक)
2) मिक्सर -  अण्णापदार्थ वाटून बारीक करण्यासाठी. (शेंगदाणे, खोबरे, भाजीसाथीचे वाटण)
3) कढई - पदार्थ टाळण्यासाठी. (भजी, बटाटे वडे )
4) किसणी - खोबरे, बटाटे किसण्यासाठी.
अशाप्रकारे वेगवेगळ्या साधनांची माहिती देण्यात आली





उपक्रमाचे नाव - रव्याचे अप्पे. 
साहित्य - रवा, दही, शिमला मिरची, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, मीठ, तेल, अप्पे पात्र, इ. 
कृती -  प्रथम शीमला मिरची, कांदा, टोमॅटो बारीक चिरून घ्यावेत. एका बाऊलमध्ये रवा, चिरलेली मिरची, टोमॅटो, कांदा, दही, मीठ एकत्र मिक्स करून घ्यावे. हवे असल्यास थोडे पाणी टाकावे व एक दोन तास झाकून ठेवावे नंतर आप्पे पात्राला तेल लावून घ्यावे व त्यामध्ये चमच्याने थोडे थोडे मिश्रण टाकावे व झाकण ठेवावे 2 मिनिटांनी झाकण काढून आप्पे पलटी करावे व एका भांड्यामध्ये काढून घ्यावे आप्पे टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करावे. यामधून मुलांनी वाफविणे ही प्रक्रिया अभ्यासली. 



NOVEMBER 2020

शेती व पशुपालन विभाग 



 इयत्ता आठवी 

उपक्रमाचे नाव :मेथीच्या जुडीची विक्री करणे .
थोडक्यात माहिती :इयत्ता आठवी च्या मुलांनी मेथीचा जुडीची विक्री करण्यासाठी सर्वप्रथम रानातील मेथी उपटली सुतळीच्या साह्याने ती मेथी बांधून घेतली .एकूण अकरा मेथीची जुडी निघाली .पाच रुपये याप्रमाणे विक्री केली .55 रुपये इतके मेथीच्या जुड्यांचे पैसे झाले .या मेथीच्या जुड्यांची विक्री शाळेतील शिक्षकांना केली .खर्च वजा जाता वीस रुपये इतका नफा झाला .या उपक्रमाच्या साह्याने मुलांना प्रत्यक्ष माल शेतीमधून विक्रीसाठी बाजारामध्ये कसा नेतात आणि विक्री केल्यानंतर त्याचा हिशोब मुलांना ठेवता आला .या उपक्रमाचे सर्व इत्थंभूत माहिती मुलांनी व्यवस्थितरित्या वहीमध्ये लिहून घेतली .





अभियांत्रिकी विभाग

इयत्ता—आठवी
उपक्रमाचे नाव–शाळेतील टॉयलेट पत्रा फिटिंग
साहित्य–मेजरींग टेप, गुण्या, कात्री ,हांड ग्लोव्हज,पोगर,हातोडी
कृती–प्रथम आम्ही मुलांना माहिती दिली ,खराब झालेले पत्रे काढून नवीन पत्रे फिट्टींग केले त्यासाठी प्रथम लांबी×रुंदी काढली 
40 गेजच्या पत्रा घेतला, 7 फुटाचे पत्रे कट्टींग करून व्यवस्थित पत्रे फिटींग केले 
अश्याप्रकारे पत्रे फिटिग केले 
लोकोपयोगी सेवेचे नाव –शाळेतील संडास बाथरूमचे पत्रे फित्तिंग केले 
खर्च–200रुपये इतका झाला 
नफा –100रुपये






ग़ृह व आरोग्य विभाग 



उपक्रमाचे नाव - मिठीचे पराठे बनविणे. 
साहित्य - गव्हाचे पीठ, मेथीची भजी, हिरवी मिरची, मीठ, तेल, लसूण, इ. 
कृती -  प्रथम मेथी बारीक चिरून घ्या. त्यामध्ये मीठ, मिरची, लसुन बारीक करून मिक्स करून घ्या. नंतर हे सर्व गव्हाच्या पिठामध्ये व्यवस्थित मळून घ्या व त्याचे छोटे छोटे गोळे तयार करुन पोळपाट लाटन्याने  लाटून द्या. गॅसवर तवा ठेवून पराठे भाजून घ्या व त्याला वरून खालून तेल लावा. यामधून मुलांनी अन्नपदार्थ बनविण्याच्या प्रक्रियेमध्ये भाजणे ही प्रक्रिया अभ्यासली. 








OCTOBER 2020

शेती   विभाग


 बीजप्रक्रिया करणे 

इयत्ता आठवी 
थोडक्यात माहिती :इयत्ता आठवी च्या मुलांनी बीजप्रक्रिया कशी करणे हे प्रात्यक्षिक स्वतः केले बीज प्रक्रिया केल्यामुळे बीजप्रक्रिया होणारे फायदे आणि बीजप्रक्रिया केल्यामुळे उत्पादनामध्ये होणारी वाढ या संदर्भात मुलांनी माहिती घेतली .बीजप्रक्रिया करण्यासाठी मुलांनी मेथीचे बी गुळ पाणी आणि रायझोबियम याचा उपयोग केला .बीजप्रक्रिया केलेले मेथीचे बिग मुले शेतामध्ये टाकणार आहेत आणि त्याचे निरीक्षण करून बीजप्रक्रिया चे होणारे फायदे नमूद करणार आहेत







ग़ृह व आरोग्य   विभाग


उपक्रमाचे नाव - कांदा भजी करणे. 
साहित्य - बेसनपीठ, लाल तिखट, मीठ, तेल, ओवा, खायचा सोडा, हळद, कोथिंबीर, इ. 
कृती -  प्रथम  कांदे कापून घ्यावेत. नंतर एका बाउल मध्ये कापलेले कांदे, बेसन पीठ, मीठ, हळद, लाल तिखट, ओवा इत्यादी साहित्य टाकून थोडे थोडे पाणी टाकून पीठ भिजवून घ्यावेत. हे मिश्रण जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नसावे. वरून थोडा खायचा सोडा टाकावा व बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी नंतर गॅसवर कढई ठेवून तेल गरम झाल्यावर छोटी छोटी भजी तळून घ्यावी. यामधून मुलांनी तळणे ही प्रक्रिया अभ्यासली. 





अभियांत्रिकि विभाग 

उपक्रमाचे नाव –शाळेतील पाण्याच्या टाकीचे नळ फिट्टिग
साहित्य –पाइप ,पान्हा मेजोरींग टेप 
कृती–पाण्याच्या टाकीचे तुटलेले नळ काढून आम्ही ते नवीन फिट्टिग केले 
मुलांना समजावून पाइप पान्हा याच्या द्वारे खराब नळ काढून नवीन सॉकेट फिट्टिग केले 
लाईन होती आणि मुलांच्या लक्षात आले नळ फिट्टिग कसे करायचे यामध्ये मुलांचे कौशल्य आले 
अशाप्रकारे नळ फिट्टिग करून लिकेज् बंद केले 
लोकोपयोगी सेवेचे नाव –पाण्याच्या टाकीचे नळ फिट्टिग 
खर्च –400रुपये 
नफा –100रुपये








SEPTEMBER 2020

शेती विभाग 

जनावरासाठी चारा असणे आरोग्यासाठी आवश्यक असते. योग्य आहार असेल तर जनावरे सुदृढ आणि निरोगी राहतात. जनावरांना ओला आणि सुका चारा योग्य प्रमाणात असेल तर त्यांचे आरोग्य नीट राहते. मका ,ज्वारी ,पेंड मली , ना सलेल्या दुधातील प्रथिने, हिरवा चारा वाळलेला चारा या सर्वांचा समावेश पशुखाद्य यामध्ये होतो. विद्यार्थीनी ही सर्व माहिती व्यवस्थित लिहून घेतली.






उपक्रमाचे नाव - रक्तदाब तपासणे. 
साहित्य - स्टेथोस्कोप, रक्तदाब मापक यंत्र, हात धुण्यासाठी साबण, इ. 
कृती -  प्रथम ज्या व्यक्तीचे रक्तदाब तपासायचे आहे अशा व्यक्तीला खुर्चीवर आरामशीर बसवावे नंतर हाताच्या कोपऱ्यापासून साधारण 2 ते 3 cm  वर दांडा ला हवेची पट्टी व्यवस्थित गुंडाळावी व पट्टी मधून येणाऱ्या दोन नळ्या कोपऱ्या कडच्या बाजुला खाली घ्याव्यात व डिजिटल यंत्रावर on चे बटन दाबावे. त्यामध्ये आपल्याला रेडींग दाखवले जाते. सर्वसाधारणपणे मानवी शरीराचा रक्तदाब हा 120/80 mmhg  इतका असतो. रक्तदाब मोजताना रेडींग जर 140/90mmhg च्यावर  गेले तर त्याला उच्च रक्तदाब असे म्हणतात. नंतर हात साबणाने स्वच्छ धुऊन घ्यावे. 









उपक्रमाचे नाव-शेळी गोठा गेट तयार करणे
साहित्य-मेजरींग टेप, हातोडी, छणी, मार्कर, वेल्डिंग रोड,कटर मशिन,अॅप्रॉन
कृती-प्रथम आम्ही लांबी×रूंदी चे माप घेतले ३×६ मेजरींग टेपच्या साह्याने घेतले प्रथम 
१×१ च्या टयुब घेवून ६फुटांचे २ नग कटींग केले नंतर ३फुट २नग कटींग करून ते चारही कोपरे एकञ करून चौकोन तयार केले अशा प्रकारे आम्ही ३फुट शटर पट्टी जोडले निम्या भागात ग्रिल १०एमएम बार लावले वेल्डिंग पूर्ण केले.
लोकोपयोगी सेवेचे नाव-शेळी गोठा गेट तयार केले.
खर्च-३००₹
नफा-४००₹












                                                                  अभियांत्रिकी विभाग.                                                      ...